दर्कागल अध्यायात वराहमिहिराने पाण्याच्या उपलब्धतेबाबत जी लक्षणे सांगितली आहेत, ती आपण अभ्यासतो आहोत. ती अशी
निर्जल प्रदेशात असलेल्या अंजिराच्या किंवा औदुंबराच्या झाडाच्या पश्चिमेस दहा हातांवर खोदकाम करताना पाच हातांवर एक सर्प आणि काजळासारखा काळा पत्थर आढळल्यास भूपृष्ठाखाली साडेचार पुरुष अंतरावर पाणी मिळते. ते गोड पाणी असते.
अर्जुन वृक्षाच्या उत्तरेस वारूळ असल्यास पश्चिमेला तीन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाण्याचा झरा सापडतो. खोदतांना तीन हातांवर एक पांढरा सरडा, पाच हातांवर क्रमाने करडी, काळी, पिवळी व पांढरी माती असून, त्याखाली वाळूयुक्त माती मिळते व नंतर भरपूर पाणी सापडते.
निर्गुंडीच्या झाडाजवळ वारूळ असल्यास दक्षिणेला तीन हातांवर दोन पुरुष खोलीवर गोड व अखंड पाण्याचा झरा मिळतो. अडीच हात खोलीवर लाल मासा, तपकिरी रंगाची माती, नंतर वाळूचा पातळ थर व नंतर पाणी असा क्रम असतो.
बोरीच्या पूर्वेला वारूळ असल्यास पश्चिमेला तीन पुरुष खोल खोदावे. अडीच हात खोलीवर पांढरा सरडा सापडल्यास निश्चित पाणी मिळते.
बोरीचे व पळसाचे झाड जवळ जवळ असल्यास त्यांच्या पश्चिमेला तीन हातांवर खोदतांना पाच हात खोलीवर बिनविषारी सर्प आढळल्यास, तीन पुरुष खोलीवर पाणी मिळते.
बेल व औदुंबर यांची झाडे जवळ जवळ असल्यास त्यांच्या पश्चिमेला तीन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाणी असते. खोदताना अडीच हातांवर काळा बेडूक आढळतो.
औदुंबराच्या वृक्षाजवळ वारूळ आढळल्यास तीन पुरूष खोलीवर पश्चिमाभिमुख वाहणारी जलशिरा मिळते. अडीच हातांवर पांढरा उंदीर सापडून पिवळी माती व पांढरा दगड सापडल्यास अखंड पाण्याचा झरा मिळतो.
निर्जल प्रदेशात कम्पिल्लक (कदंब) नावाचा वृक्ष आढळल्यास त्याच्या पूर्वेला तीन हात अंतरावर व तीन पुरुष खोलीवर एक दक्षिणाभिमुखी वाहणारी जलशिरा मिळते. खोदतांना प्रथम निळी व नंतर पांढरी माती एक हात खोली. बोकडासारखा वास येणारा मासा व क्षारयुक्त थोडे पाणी अशी लक्षणे आढळतात.
शोणाकवृक्षाच्या वायव्य दिशेला दोन हात अंतरावर व तीन पुरुष खोलीवर कुमुदा नावाची जलशिरा निश्चित सापडते.
बिब्याच्या झाडाच्या दक्षिणेला जवळच वारूळ असेल, तर वारुळातून पूर्वेला दोन हात अंतरावर दीड पुरुष खोलीवर पाणी मिळते; तसेच पश्चिमेला वारूळ असल्यास झाडाच्या उत्तरेला एक हात अंतरावर व साडेचार पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पांढरा सरडा किंवा विंचू, लाल रंगाचा दगड व त्याखाली पश्चिमाभिमुख वाहणारी मोठी जलशिरा असा क्रम असतो; परंतु ही जलशिरा तीन वर्षांनी नष्ट होते.
दर्भांनी भरलेल्या वारुळाच्या ईशान्य दिशेला कोरडाच. झाड असेल तर ते झाड व वारुळ यांच्या मध्यभागी साडेपाच पुरुष खोलीवर भरपूर पाणी मिळते. खोदतांना पाच हातांवर पांढरट रंगाचा साप, त्या खोलीवर पाणी मिळते. खोदताना अडीच हातावर एक हिरवा बेडूक, नंतर हळदीसारखी पिवळी माती आणि त्याखाली मेघासारखा श्यामवर्णाचा दगड सापडतो. त्याखाली उत्तराभिमुख अखंड वाहणारी जलशिरा मिळते.
एखाद्या वृक्षाखाली एक किंवा अनेक बेडूक वस्ती करून राहात असतील तर त्याच्या उत्तरेला एक हात अंतरावर साडेचार पुरुष खोलीवर पाण्याचा साठा सापडतो.
करंजीच्या झाडाच्या दक्षिणेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला दोन हातांवर व तीन पुरुष खोलीवर पाणी आढळते. खोदताना अडीच हातावर एक लहान कासव व नंतर पूर्वाभिमुख वाहणारी जलशिरा, नंतर पुन्हा एक उत्तराभिमुख जलशिरा, नंतर एक हिरवा किंवा पिवळा दगड व त्याच्या खाली अखंड पाणी मिळते.
मोहाच्या वृक्षाच्या उत्तरेला वारूळ असल्यास वृक्षाच्या पश्चिमेला पाच हातावर साठेआठ पुरुष खोलीवर पाणी असते. प्रथम पाच हातावर एक मोठा सर्प, नंतर तपकिरी माती, नंतर कुळीथाच्या रंगाचा दगड व सर्वांत शेवटी पूर्वाभिमुख वाहणारी फेसाळ पाणीयुक्त जलशिरा मिळते.
तिलक (तीळ) वृक्षाच्या दक्षिणेला दर्भ व दुर्वा यांनी भरलेले चकाकणारे वारूळ असेल तर वृक्षाच्या पश्चिमेला पाच हात अंतरावर पंचवीस हातावर पाणी लागते. ही जलशिरा पूर्वाभिमुख असते.
ताडाच्या किंवा नारळाच्या बुंध्याशी वारूळ आढळले तर पश्चिमेला सहा हातावर व वीस हात खोलीवर दक्षिणाभिमुख वाहणारा जलस्रोत मिळतो.
कपित्थवृक्षाच्या (कवठ) दक्षिणेला वारूळ असेल तर विरुद्ध उत्तर दिशेला सात हातावर पंचवीस हात खोल खणावे, पाच हातांवर एक चित्रविचित्र ठिपक्यांचा साप, नंतर काळी माती, एक कठीण दगड, पुढे पांढरी माती व त्याच्याखाली प्रथम पश्चिमाभिमुख व नंतर उत्तराभिमुख वाहणारा जलस्रोत मिळतो.
अश्मन्तक वृक्षाच्या उत्तरेला बोरीचे झाड वारूळ असेल तर उत्तरेला सहा हातावर व साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. खणताना पाच हातावर एक कासव, नंतर निळा दगड, वाळूयुक्त माती नंतर एक दक्षिणवाहिनी जलशिरा व त्यानंतर ईशान्यवाहिनी जलशिरा मिळते.
दारू हळदीच्या झाडाच्या वारूळ असेल तर पूर्वेला तीन हातावर खणल्यास पावणे एकोणतीस हातावर पाणी लागते. खणताना प्रथम पाच हातावर निळा साप, नंतर पिवळी माती, नंतर पाचूच्या रंगाचा दगड, पुढे काळी माती व तिच्याखाली एक पश्चिमाभिमुख व नंतर दक्षिणाभिमुख जलशिरा सापडते.
एखाद्या निर्जल प्रदेशात विशिष्ट ठिकाणी दुर्वा किंवा विरळ गवताचा भाग आढळला तर त्याखाली पाच हातावर पाणी मिळते.
एका प्रकारचे वांगे, त्रिवृता, दंती, सूकरपादी लक्ष्मणा (वेलवर्गीय काटेरी) आणि नवमालिका (जुई) या वनस्पती या वेळी जर एखाद्या भागात आढळल्या, तर त्यांच्या दक्षिणेला दोन हातावर व पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.
एखाद्या भागातील वृक्षांची पाने जर मऊ व चकाकणारी असली, फांद्या लांबवर पसरून लोंबत असल्या तर त्या भागातील भूगर्भात पाण्याचा साठा असतो.
याउलट रूक्ष व निस्तेज पाने, वाळल्यासारखे दिसणारे खोड अशी वृक्षांची स्थिती असेल तर त्या भागात पाणी नाही, असे समजावे.
तिलक, अंबाडी, वरुण, भल्लातक, बिल्व, तिन्दुक, अंकोल, पिंडार, शिरीष, अंजन, परुषक, वंजुल (अशोक) आणि अतिबला या वनस्पतींची पाने स्निग्ध व तेजस्वी असली आणि आजूबाजूला वारूळ असेल तर तेथे उत्तरेला तीन हातावर साडेबावीस हात खोलीवर पाण्याचा साठा असतो.
क्रमश:
-डॉ. सौ. रजनी जोशी, बार्शी, जि. सोलापूर ९९२१०७७६२३, (संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत)

No comments:
Post a Comment