संदर्भ-दै.प्रहार/१२.०६.२००९
उमेदवारांनी पदासाठी दिलेला पसंतीक्रम व त्यांचा गुणवत्ताक्रम यांच्यात आयोगाच्या अधिका-यांनी घोळ घातल्यामुळे मुख्य परीक्षेचा जाहीर निकाल मागे घेण्याची नामुष्की आयोगावर आली आहे.
मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर, राज्यसेवा मुख्य परीक्षा-२००६ चा जाहीर केलेला निकाल प्रशासकीय हलगर्जीपणामुळे मागे घेण्याची नामुष्की आली आहे. गेल्या सोमवारी आयोगाने मुख्य परीक्षा-२००६ चा अंतिम निकाल जाहीर केला होता. या निकालात मुलींनी बाजी मारली होती. पण निकालात वर्ग-२ च्या उमेदवारांनी पदासाठी दिलेला पसंतीक्रम आणि त्यांचा गुणवत्ताक्रम यांच्यात आयोगाच्या अधिका-यांनी घोळ घातला आहे.ही चूक लक्षात आल्यानंतर आयोगाने बुधवारी हा निकाल तातडीने वेबसाइटवरून मागे घेतला. या निकालाची जबाबदारी असलेले एक अवर सचिव रजेवर गेले आहेत. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मात्र आयोगाच्या नेहमीच्या बेजबाबदारपणाचा पुन्हा अनुभव आल्यामुळे हवालदिल झाले आहेत. या चुकीचा सर्वात अधिक फटका वर्ग-२ पदासाठी उत्तीर्ण झालेल्या २७९ उमेदवारांना बसणार असून या निकालात फेरफार होण्याची शक्यता आहे.पण या यादीत नवे उमेदवार सामील होणार नसल्याचे सांगितले जात आहे. वर्ग-१च्या पदांमध्ये मात्र अशी चूक झाली नसल्याचे समजते. सुधारित निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
सोमवारी हा निकाल जाहीर झाल्यानंतर वर्ग-२ पदांसाठी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदासाठी त्यांनी दिलेले पसंतीक्रम आणि त्यांचा गुणवत्ताक्रम यांच्यात तफावत असल्याचे जाणवले. यामुळे काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीत उमेदवारांचा पसंतीक्रम लक्षात न घेता केवळ गुणवत्ताक्रम विचारात घेण्याची चूक आयोगाच्या अधिका-यांनी केल्याचे निदर्शनास आले.

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....
No comments:
Post a Comment