मुंबई- अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (MHT-CET २००९ ) निकाल रविवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी ‘सीईटी’साठी बसले होते. ५८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील तीन हजार ७८५ जागा, २२१ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ७१ हजार ७०१ जागा आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १३१ महाविद्यालयांमधील सात हजार ६७५ जागांवर या ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत.
सकाळी १० वाजल्यापासून आपला निकाल येथे बघता येईल.

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....
No comments:
Post a Comment