साभार- दै.प्रहार/वृत्तसंस्था/२२.०७.२००९

नाशिक- उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी तब्बल ६,५०९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली. नाशिक येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
कोकणापाठोपाठ उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठीही मोठी तरतूद केली जाणार अशा अटकळी बैठकीपूर्वीच बांधल्या जात होत्या. त्यानुसार नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ६,५०९ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले.
नाशिक
- येवला तालुक्यातील मुखेड येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाची उभारणी
- निफाड येथे निवासी शाळा उभारण्यासाठी ६.१५ कोटी रुपयांची तरतूद
- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण
- नाशिक शहरात क्रीडा संकुलासाठी १५० कोटी
- जिल्ह्यात फळे व भाजीपाल्यासाठी शीतगृहांची साखळी तयार करण्यासाठी प्रकल्प
- नाशिक शहरात पर्यटन विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी ६०.१७ कोटी रुपयांची तरतूद
- सप्तशृंगीगड, इगतपुरी (घाटनदेवी ), त्र्यंबकेश्वर, कावणाई मंदिर परिसर विकास, अंकाई किल्ला येवला, निवृत्तीनाथ समाधी आदींचा पर्यटन स्थळ म्हणून विकास
- येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उभारणी. येवला मुक्तीभूमीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद
- नाशिक नगर विकास प्राधिकरणाची स्थापना
- नाशिकमध्ये नदीजोड प्रकल्प राबवणार
- नाशिक येथे महिला रुग्णालय
- मालेगांव येथे नर्सिंग कॉलेज
- इगतपुरी येथे निवासी शाळा उभारण्यासाठी ६.१५ कोटी रुपयांची तरतूद
- सिन्नर येथील एम.आय.डी.सी. मध्ये ट्रक टर्मिनसची उभारणी
- प्रत्येक तालुक्यात दोन मेगा पाणलोट क्षेत्र
- जिल्ह्यात नागरी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ७०.८७ कोटी रुपये तरतूद
- जिल्ह्यात प्रत्येकी ३०० डयुएल पंप बसविण्याची कार्यवाही
- जिल्ह्यातील दोन कृषी प्रक्रिया संस्थांना प्रतिवर्षी २० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य
- नाशिक येथे सार्वजनिक, खाजगी भागीदारीतून टर्मिनल मार्केट, ६० कोटी रुपयांची तरतूद
- जिल्ह्यात फार्मपॅक हाऊस स्थापन करण्यासाठी तरतूद
- जिल्ह्यात बहुउत्पादन प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी
- नाशिक येथे बेदाणा, वाईन उत्पादन समूह, तर येवला येथे पैठणी उत्पादन समूह
- नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे नवीन ग्रामीण रुग्णालय
- चांदवड येथे ट्रॉमा केअर युनिट
- नांदुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र
- अंबेदिंडोरी येथे पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या सभागृहाचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद.
- नाशिक येथे पोलीस आयुक्तालय कार्यालय बांधकामासाठी ८.२७ कोटी रुपयांची तरतूद
- नाशिक येथे आरटीओ कार्यालय उभारणीसाठी तरतूद
- जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये एकलव्य मॉडेल स्कूलची स्थापना
- नाशिक येथे कांदा साठविण्याच्या कांदा चाळींसाठी- ४० कोटी रुपये तरतूद
- नाशिक जिल्ह्यात रेल्वे उड्डाणपूल
- नाशिक विभागातील औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा, जलशुध्दीकरण केंद्र, अंतर्गत रस्ते, या सुविधा पुरविण्यासाठी १८१ कोटी रुपयांची तरतूद.
- नाशिक विभागात एमआयडीसीमार्फत वेगवेगळया ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासाठी ९ हजार ३४३.३९ हेक्टर क्षेत्र संपादित करणार
- एचएएल विमानतळावर पॅसेंजर टर्मिनल इमारत बांधणे व इतर सुविधांसाठी ३० कोटी रुपये (हिंदुस्थान एरोनॉटिक्स यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ओझर येथील विमानतळावर व्ही.आय.पी. कक्ष, पायलट रुम, कॅफेटेरिया, प्रवासी कक्ष, कार पार्कींग, इत्यादी सुविधा निर्माण केल्या जातील.)
- सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण
- नाशिक आणि इगतपुरी येथे आदिवासी क्रीडा प्रबोधिनी
- अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, जैन, बौध्द, ख्रिश्चन, शिख व पारशी या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृह.
- नांदूर मधमेश्वर अभयारण्याचा विकास
- नाशिक वनविभागात वनांचे संरक्षण संवर्धन विकास व व्यवस्थापन स्थानिकांच्या सहाय्याने करणार
- मालेगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी
- मालेगाव येथे बसस्थानक व आगाराची पुनर्बांधणी
- नाशिक विभागात ओढा रेल्वे स्थानक येथे गुड्स टर्मिनल बांधण्यासाठी १ कोटी रुपये
- सप्तश्रृंगी येथील तीर्थक्षेत्रासाठी विकास प्राधिकरणाची स्थापना
- शिर्डी विकास प्राधिकरणाची स्थापना
- शिर्डी विमानतळासाठी ४०० हेक्टर जमीन संपादनाची कार्यवाही. जमीन संपादनासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद
- अहमदनगर येथे ऑटो अभियांत्रिकी समूह
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारणीसाठी ४.६२ कोटी रुपयांची तरतूद
- श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीत ८० हेक्टर शेततळावर फूड पार्कचा विकास
- राहुरी येथे मुलांसाठी नवीन वसतिगृह बांधकामासाठी ३.२६ कोटी रुपयांची तरतूद
- कर्जत येथे मुलांचे नवीन वसतिगृह बांधकामासाठी ३.२६ कोटी रुपयांची तरतूद
- अहमदनगरमध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय
- प्रत्येक तालुक्यात दोन मेगा पाणलोट क्षेत्र
- जिल्ह्यात नागरी नळ पाणी पुरवठा योजनांसाठी तरतूद
- जिल्ह्यात प्रत्येकी ३०० ड्युएल पंप बसविण्याची कार्यवाही
- जिल्ह्यात फळे व भाजीपालासाठी शीतसाखळी प्रकल्पाची उभारणी
- जिल्ह्यातील दोन कृषी प्रक्रिया संस्थांना प्रतिवर्षी २० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य
- जिल्ह्यात फार्मपॅक हाऊस स्थापन करण्यासाठी तरतूद
- अहमदनगर येथे नवीन जिल्हा ग्रंथालय स्थापनेसाठी सहाय्य
- अहमदनगर भुईकोट किल्ला, श्रीक्षेत्र देवगड संस्थान व ज्ञानेश्वर समाधी, नेवासा यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास
- बिबट्यांचे संरक्षण व जखमी बिबट्यांच्या उपचारासाठी बेलवंडी येथे बिबटा निवारा केंद्र स्थापन करणार
- कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा विकास
- श्रीरामपूर व नगर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालये बांधणार
- जामखेड येथे बसस्थानक व आगाराची पुनर्बांधणी
- अमळनेर येथे मुलींचे नवीन वसतिगृह बांधकामासाठी ३.२६ कोटी रुपयांची तरतूद
- रावेर येथे मुलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी ३.२६ कोटी रुपयांची तरतूद
- रावेर येथे मुलींचे वसतिगृह, जळगांव येथे मुलांचे वसतिगृह, अमळनेर येथे निवासी शाळा तसेच चाळीसगाव येथे निवासी शाळा बांधकामासाठी १८.८२ कोटी रुपयांची तरतूद
- जिल्ह्यात नाट्यगृहाची उभारणी
- प्रत्येक तालुक्यात दोन मेगा पाणलोट क्षेत्र
- जिल्ह्यात प्रत्येकी ३०० ड्यूएल पंप बसविण्याची कार्यवाही
- जिल्ह्यात फळे व भाजीपाल्यासाठी शीतसाखळी प्रकल्पाची उभारणी
- जिल्ह्यातील दोन कृषी प्रक्रिया संस्थांना प्रतिवर्षी २० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य
- जळगांव येथे पाडळसे धरण बांधणार
- पाटणादेवी मंदिर परिसर, कोथळी मुक्ताईनगर, आणि पाल या ठिकाणांचा विकास
- यावल अभयारण्याचा विकास करणार
- शिरपूर येथे अम्युझमेंट पार्क
- धुळे येथील एमआयडीसीमध्ये धावपट्टीचा विस्तार व रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सोय करण्यासाठी १५ कोटी रुपये
- धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद
- सर्व तालुक्यांमध्ये प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सहाय्य
- शिंदखेडा, धुळे येथे मुलांचे नवीन वसतिगृह व धुळे आणि शिंदखेडा येथे निवासी शाळा उभारण्यासाठी १८.८२ कोटी रुपयांची तरतूद
- प्रत्येक तालुक्यात दोन मेगा पाणलोट क्षेत्र
- जिल्ह्यात नागरी नळ पाणी पुरवठा योजनांसाठी तरतूद
- जिल्ह्यात प्रत्येकी ३०० ड्यूएल पंप बसविण्याची कार्यवाही
- जिल्ह्यात नवीन अंडी उबवणी केंद्राची स्थापना
- जिल्ह्यात फळे व भाजीपाल्यासाठी शीतसाखळी प्रकल्पाची उभारणी
- जिल्ह्यातील दोन कृषी प्रक्रिया संस्थांना प्रतिवर्षी २० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य
- जिल्ह्यात फार्मपॅक हाऊस स्थापन करण्यासाठी तरतूद
- जिल्ह्यात मल्टिप्रॉडक्ट प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी
- गोंदूर लघुपाटबंधारे तलाव परिसर विकास
- जिल्ह्यातील अंगणवाडीच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी
- जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये एकलव्य मॉडेल स्कूलची स्थापना
- गोंदूर येथे पर्यटन सुविधा विकास, शिंदखेडा, कपिलेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, शिरपूर या स्थळांचा विकास
- अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, जैन, बौध्द, ख्रिश्चन, शिख व पारशी या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतिगृह
- अणेर धरण अभयारण्याचा विकास
- धुळे वनविभागात स्थानिक आदिवासींच्या सहाय्याने वनांचे संरक्षण, संवर्धन, विकास व व्यवस्थापन करणार
- धुळे येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी
- शिरपूर व साक्री येथे बसस्थानक व आगाराची पुनर्बांधणी
- नंदुरबार येथे महिला रुग्णालय
- प्रकाशा विकास सर्किट, आमळी या स्थळांचा विकास
- जिल्ह्यात तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)ची उभारणी
- नंदुरबारमध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय
- सर्व तालुक्यांमध्ये प्रशासकीय इमारती
- नवापूर येथे ट्रॉमा केअर सेंटर
- जिल्ह्यात नर्सिंग कॉलेजची उभारणी
- प्रत्येक तालुक्यात दोन मेगा पाणलोट क्षेत्र
- जिल्ह्यात नागरी नळ पाणी पुरवठा योजनांसाठी तरतूद
- जिल्ह्यात प्रत्येकी ३०० ड्यूएल पंप बसविण्याची कार्यवाही
- जिल्ह्यात नवीन अंडी उबवणी केंद्राची स्थापना
- जिल्ह्यात फळे व भाजीपालासाठी शीतसाखळी प्रकल्पाची उभारणी
- जिल्ह्यातील दोन कृषी प्रक्रिया संस्थांना प्रतिवर्षी २० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य
- जिल्ह्यात फार्मपॅक हाऊस स्थापन करण्यासाठी तरतूद
- जिल्ह्यात मल्टिप्रॉडक्ट प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी
- नंदुरबार येथे नर्स मिडवाईफ प्रशिक्षण केंद्र
- जिल्ह्यातील अंगणवाडीच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी
- जिल्ह्यातील तालुक्यामध्ये एकलव्य मॉडेल स्कूलची स्थापना
- नंदुरबार येथे नवीन जिल्हा ग्रंथालय स्थापनेसाठी सहाय्य
- नंदुरबार येथे नवीन वसतिगृह उभारण्यासाठी ३.२६ कोटी रुपयांची तरतूद
- नंदुरबार येथे मिरची व्यापार व प्रक्रिया केंद्र
- नंदुरबार येथे राहुरी कृषि विद्यापिठाचे उपकेंद्र स्थापण्यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद
- नंदुरबार येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी सुरु करण्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद
- अक्कलकुवा व धडगांव येथील विशेष कृती कार्यक्रमासाठी १२४ कोटी रुपये
- नंदुरबार येथे आदिवासी मध्यवर्ती क्रीडा केंद्र
- नंदुरबार येथे आदिवासींची संस्कृती जपण्यासाठी संग्रहालय उभारणीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद
- अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, जैन, बौध्द, ख्रिश्चन, शिख व पारशी या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतिगृह
- नंदुरबार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
- नंदुरबार येथे नवीन आगार, बसस्थानक व प्रशासकीय इमारतीची उभारणी
- तळोदा येथे मिनी एसटी स्थानकाची उभारणी
No comments:
Post a Comment