स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Thursday, May 14, 2009

महारोगी सेवा समिती, वरोरा

१४ मे २००९/अँग्रोवन
कायमस्वरूपी निधीची गरज

महारोगी सेवा समिती, वरोरा या संस्थेच्या कामाशी आपण परिचित आहात. बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांकरिता सन १९४९ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र कुष्ठरुग्णांच्या उपचार, प्रशिक्षण आणि मानसिक, सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाबरोबर अंध, अपंग, मूकबधिरांच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनासाठी विस्तारले.
आदिवासींना शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना शेती करण्याचे आणि अन्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचे काम संस्थेने केले. शेतकऱ्यांना विद्यमान परिस्थितीत दीर्घकालीन फायद्याचा तोडगा काढून देण्याच्या दृष्टीने संस्थेने यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षापासून काम सुरू केले आहे. हा पाच हजार व्यक्तींचा संसार चालवण्याचे शिवधनुष्य संस्थेने इतकी वर्ष पेलले, ते या कामाला आर्थिक आणि अन्य मार्गाने मदत करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींच्या सहकार्याने. याचबरोबर शेतीच्या माध्यमातून धान्य, भाजीपाला, फळे याचे उत्पादन घेऊन तसेच चपलांपासून फर्निचरपर्यंत आणि सर्व प्रकारच्या कपड्यांपासून स्टेशनरीपर्यंत बऱ्याचशा दैनंदिन गरजा व्यवसाय प्रशिक्षण- पुनर्वसनाच्या मार्गाने भागवून. असे केल्यामुळे संस्था मोठ्या प्रमाणात स्वावलंबी होऊ शकली. तरी हे स्वावलंबन शंभर टक्के नाही. याव्यतिरिक्त विजेची बिले, चहा, साखर, मीठ, इंधन, औषधे इ. वस्तूंसाठी रोख पैसा खर्च होतोच. नियमानुसार मर्यादित अनुदान मिळत असले तरी ते पुरेसे नाही. शिवाय त्यामध्ये अनियमितता आहे. या सर्व कामाला एक शाश्‍वत स्वरूपाचे आर्थिक स्थैर्य यायला हवे असेल तर त्याकरिता कायमस्वरूपी निधीची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारच अर्थखात्याकडे अर्ज करून रु. ३७५.५ कोटी एवढा कायमस्वरूपी निधी उभारण्यासाठी त्यांची मान्यता संस्थेने नुकतीच मिळविली आहे. या कायमस्वरूपी निधीला देणगीरूपाने मदत करणाऱ्या कंपनीला तसेच व्यावसायिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला देणगीच्या रकमेवर प्रातिकर कलम ३५ अंतर्गत तर पगारदार तसेच व्यवसायाव्यतिरिक्त इतर माध्यमांतून उत्पन्न प्राप्त होत असलेल्या व्यक्तीला देणगीच्या रकमेवर प्राप्तिकर कलम ८०जीजीए २ (बीबी) अंतर्गत १०० टक्के वजावट मिळणार आहे.देनागीचा धनादेश "महारोगी सेवा समिती, वरोरा' या नावाने असावा.

- कौतुभ आमटे, वरोरा.

महारोगी सेवा समिती, वरोराSocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment