स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Wednesday, May 13, 2009

चला ऽ रं उठा ऽ रं शेतकरी दादा

चला ऽ रं उठा ऽ रं शेतकरी दादा कामकरी दादा ॥ध्रु॥

भारतमाता आपुली आई सापाचा विळखा पडलाय पायी
गरूड होन सोडवुया तिजला चला ऽ ॥१॥

भगवा झेंडा आज आमुचा रंग तयाचा फिक्का पडला
रक्ताच्या रंगाने रंगवुया त्याला चला ऽ ॥२॥

रामचंद्राने लंकेस नेला श्रीकृष्णाच्या रथी फडकला
देवादिकांचा झेंडा पुजायला चला ऽ ॥३॥

सिंहगडावर ताना गेला पावन खिंडीत बाजी पडला
शिवरायाचा हुकुम पाळायला चला ऽ ॥४॥

राघोबादादानं अटकेस नेला केशवरावांनी संघात पुजला
प्रणाम कराया संघात त्याला चला ऽ ॥५॥

चला ऽ रं उठा ऽ रं शेतकरी दादाSocialTwist Tell-a-Friend

1 comment:

  1. कसला भारी blog बनवलांय राव....! मस्त!
    लई आवडलाय आपल्याला....

    ReplyDelete