स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.
Showing posts with label बाजार. Show all posts
Showing posts with label बाजार. Show all posts

Monday, July 6, 2009

बजेट २००९ - ठळक मुद्दे !!!

आतापर्यंतचा सर्वांत मोठा अर्थसंकल्‍प:

  • एकूण अर्थसंकल्‍पात मदतीसाठी ४० हजार कोटी.
  • बजेट १० लाख कोटींच्‍या घरात
  • सरकारी खर्चात ३६ लाख कोटींच्‍या वाढीची शक्यता.
  • विकासाचा दर ९ टक्के करण्‍यावर भर.
  • दरवर्षी १.२० नवीन नोक-या उपलब्‍ध करणार.
  • पायाभूत सुविधा मजबूत करण्‍यावर अधिक भर.
  • कृषी क्षेत्रात विकासाचा दर ४ टक्के ठेवण्‍याचे लक्ष्‍य.

आजचा बजेट देशाला स्‍थायित्व आणि विकास देण्‍यासाठी...

  • जीडीपी विकास दर ६.७
  • २०१४ पर्यंत देशातील गरीबीचा दर निम्मा कमी करणार.
  • परकीय गंगाजळीत वाढ.
  • पायाभूत सुविधेवर एक लाख कोटी रुपयांचे कर्ज.
  • मंदीवर नियंत्रणासाठी पूर्वीच्‍या संपुआ सरकारने तीन पॅकेज दिले.
  • महामार्ग विकासाचा निधी दुप्‍पटीने वाढला.
  • मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी.
  • नेहरू अर्बन मिशनचा बजेट ८० टक्के वाढविला.
  • शहरी गृहनिर्माणासाठी ४०००० कोटी रुपये.
  • राष्‍ट्रीय गॅस ग्रीड विभागाचा विकास करणार.
  • मुंबईत ड्रेनेजसाठी ३०० कोटी रुपये.
  • कृषी कर्जासाठी ३.२५ लाख कोटी रुपयांची तरतुद.
  • वेळेवर कर्ज भरणा करणा-या शेतक-यांना व्‍याज दरात १ टक्क्याची सूट.
  • कृषी कर्ज माफी योजनेचा कालावधी सहा महिन्‍याने वाढविला.
  • निर्यातीसाठी पूर्ण सरकारी मदत दिली जाणार.
  • मुद्रीत माध्‍यमांसाठी दिलेल्‍या मदत पॅकेजची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविणार.
  • बँकांना ४००० कोटींची मदत देणार.
  • शेतक-यांना कृषी साहित्यावरील सबसिडी सरळ देण्‍याची योजना.
  • शेतक-यांना सात टक्के दराने कर्ज देणार.
  • पेट्रोलियम वस्‍तुंवरील किंमती नियंत्रणासाठी तज्‍ज्ञांची समिती.
  • इन्‍कम टॅक्स रिटर्न फॉर्म अधिक सुटसुटीत करणार त्‍यासाठी 'सरल-२' योजना.
  • टॅक्स सिस्‍टीम अधिक सोपी करणार.
  • बँक व विमा कंपन्‍या सार्वजनिक क्षेत्रात राहणार. (ही घोषणा करताच बँकांचे शेअर कोसळले)
  • निवडक सरकारी कंपन्‍यांमध्‍ये निर्गुंतवणूक केली जाईल.
  • निर्गुंतवणूक योजना शेअर बाजाराच्‍या माध्‍यमातून केली जाणार.
  • राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी ३९ हजार १०० कोटी रुपयांची तरतुद.
  • इंदिरा आवास योजनेतील निधीत ६३ टक्क्यांनी वाढ
  • सरकार अन्‍न सुरक्षा विधेयक लोकसभेत आणणार.
  • १००० गावांमधील दलित वस्‍त्‍यांसाठी घरे बनविणार.
  • ग्राम सडक योजनेसाठी १२ हजार कोटी रुपये.
  • ग्रामीण गृह निर्माण योजनेसाठी २०० कोटी रुपये.
  • ग्रामीण विद्युत पुरवठा योजनेसाठी ७० हजार कोटी
  • विशेष राष्‍ट्रीय महिला साक्षरता अभियान राबविणार.
  • प्रत्येक ग्रामीण गटासाठी १ बँ‍किंग सेंटरची स्‍थापना करणार.

स्वस्त/महाग..

  • दहा जीवनावश्‍यक औषधांच्‍या किंमती कमी होणार.
  • बेन्‍टेक्स ज्‍वेलरी स्‍वस्‍त होणार
  • वॉटर प्‍युरिफायर व पेट्रोल ट्रक स्‍वस्‍त होणार
  • प्रेशर कुकर व सीएफएल बल्‍ब स्‍वस्‍त होणार
  • मोबाईल व कम्‍प्युटर स्‍वस्‍त होणार
  • एलसीडी टीव्‍ही स्‍वस्‍त होणार.
  • निवडणूक निधीवरील करात १०० टक्के सूट
  • सेवाभावी संस्‍थांना दिलेल्‍या मदत करात सूट वाढणार.
  • गुंतवणूक करात सूट.
  • कमोडीटी ट्रान्‍झेक्शन टॅक्स रद्द.
  • इन्‍कम टॅक्स सवलतीची मर्यादा १.६० हजारापर्यंत वाढविली.
  • पेन्‍शन स्‍कीम मॅच्‍युरिटीवर टॅक्स
  • एफबीटी रद्द करणार.
  • डायरेक्‍्ट टॅक्सवरील सरचार्ज माफ.
  • ज्येष्‍ठ नागरिकांसाठी २ लाख ४० हजारापर्यंत उत्‍पन्‍न कर माफ.
  • महिलांना आयकरात १.९० लाखपर्यंत सुट
  • कार्पोरेट टॅक्समध्‍ये कुठलाही बदल नाही.
  • एप्रिल २०१० पासून वॅटच्‍या जागी जनरल सेल्‍स टॅक्स.
  • ४५ दिवसांत नवा डायरेक्‍ट टॅक्स कोड.
  • शैक्षणिक कर्जाच्‍या व्‍याजदरात सवलत.
  • राष्‍ट्रीय महिला कोषासाठी ५०० कोटींची तरतुद.
  • युनिक आयडेंटीफिकेशन योजनेसाठी १५० कोटींची तरतुद.
  • महिला बचत गटांसाठी भरीव तरतुद.
  • आमच्‍या सर्व योजनांमागे मध्‍यमवर्गीयांवर अधिक लक्ष.
  • सैन्‍य दलातील कनिष्‍ठ अधिका-यांसाठी एक रँक एक पेन्‍शन योजना
  • नवीन पेन्‍शन योजनेचा लाभ १२ लाख जवान आणि कनिष्‍ठ अधिका-यांना.
  • अर्धसैनिक दलासाठी १ लाख घरे बनविणार.
  • अर्ध सैनिक दलांना मजबूत करण्‍यासाठी सैन्‍य दलाइतका निधी उपलब्‍ध करून दिला जाणार.
  • केंद्रीय विद्यापीठासाठी ५० कोटींची तरतुद.
  • आयआयटी आणि एनआयटीसाठी २,११३ कोटी रुपये.
  • मुर्शिदाबाद व मलापुरममध्‍ये एएमयु कॅम्पससाठी २५ कोटींची तरतुद.
  • प.बंगालमधील आईला वादळात बेघरांसाठी १ हजार कोटींची तरतुद.
  • राष्‍ट्रकूल (कॉमनवेल्‍थ) स्‍पर्धेसाठी १६,३०० कोटींची भरघोस तरतुद.
  • श्रीलंकेतील तमीळींच्‍या मदत शिबिरांसाठी तरतुद.
  • संरक्षण खर्च १.४१ लाख कोटी.
  • सेट टॉप बॉक्स महागणार.
  • सोने आयातीवर कर वाढल्‍याने सोने वाढणार.

रुपया असा येणार... असा जाणार

यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात सरकारकडे येणा-या प्रत्‍येक रुपयातील २९ पैसे कर्जाच्‍या रकमेतून येणार आहे. तर खर्चातील प्रत्‍येक रुपयामागे १३ पैसे देशाच्‍या सुरक्षेसाठी खर्च होणार आहे.

सरकारच्‍या खर्चात एक रूपयापैकी वीस पैसे व्‍याज भरण्‍यावर खर्च होतील. तर १८ पैसे केंद्रीय योजना चालविण्‍यासाठी खर्च होणार आहेत. गैर योजना खर्चावर सरकार एक रूपया पैकी १४ पैसे खर्च करणार आहे. तर १३ पैसे संरक्षणावर खर्च केले जाणार आहेत.

राज्यांसाठी ७ पैसे आणि कर व शुल्कात राज्याच्‍या हिश्‍श्‍याचे १५ पैसे असतील. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी १ रूपयातील केवळ ४ पैसे खर्च होणार आहे.

यात सबसिडीचा हिस्सा मोठा असून ९ पैशांची सबसिडी दिली जाणार आहे.

सरकारच्‍या मिळकतीत उधारीनंतर सर्वाधिक मोठे योगदान २२ पैशांच्‍या रूपाने येणा-या कॉर्पोरेट टॅक्सचे असणार आहे. तर १२ पैसे आयकराच्‍या रूपाने येणार आहेत.

सरकारला दहा पैसे सीमा शुल्कातून, दहा पैसे उत्पादन शुल्कातून, ६ पैसे सेवा करातून, १० पैसे राजस्वमधून आणि एक पैसा गैर कर्जातून येणार आहे.

एकंदरीत सरकारच्‍या रुपयामागे ७१ पैसे कमाईचे असतील तर २९ पैसे कर्जाचे.

-X -X -X -X -X -X -X-

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

पुढे वाचा >>>
बजेट २००९ - ठळक मुद्दे !!!SocialTwist Tell-a-Friend

Sunday, July 5, 2009

बजेट का? कशासाठी?

साभार- महाराष्ट्र टाईम्स/RSS/अर्थ

कर, अबकारी, कर्ज आणि अन्य मार्गांनी सरकारला निधी गोळा करता यावा, यासाठी संसदेने अर्थसंकल्पीय पद्धतीची तरतूद केली आहे. संसदेच्या मंजुरीनंतर हा निधी सरकारी खर्चासाठी वापरला जातो.

घटनेतील कलम ११२
घटनेतील ११२व्या कलमानुसार आथिर्क वर्षासाठी संसदेसमोर ठेवलेल्या 'वाषिर्क वित्तीय निवेदना'ला राष्ट्रपती बांधील असतो.
घटनेतील ७७(३) कलम
'वाषिर्क वित्तीय निवेदन' तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्थमंत्र्यांवर असते आणि संसदेतफेर् ते राबवले जाते. याच वाषिर्क वित्तीय निवेदनाला बजेट म्हटले जाते.
बजेट कोण बनवते?
बजेट टीम -
सर्वसाधारण बजेट तसेच, राष्ट्रपती राजवट असणा-या राज्यांच्या बजेटची जबाबदारी केंदीय अर्थमंत्र्यांवर असते.
बजेटमध्ये सहभाग असणारे सरकारचे घटक :
  • नियोजन आयोग- सर्व मंत्रालयांचे 'टागेर्ट' निश्चित करणे.
  • कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल - अकाउंट्स चेक करणे.
  • प्रशासकीय मंत्रालये- गरजा मांडणे आणि प्राधान्य आखणे.
बजेट कसे बनवतात?
बजेट र्सक्युलर
नव्या आथिर्क वर्षासाठी सुधारित अंदाजित खर्चाची तयारी करणे आणि पुढील आथिर्क वर्षासाठी अंदाजित खर्च बनवण्यासाठी वित्त विभागातर्फे सर्व केंदीय मंत्रालये, सर्व राज्ये, स्वायत्त संस्था आणि विभाग तसेच, संरक्षणाच्या तिन्ही दलांना बजेट र्सक्युलर पाठवले जाते.
चर्चा/बजेटपूर्व बैठका
  • सर्व केंदीय प्रशासकीय मंत्रालये संबंधित कागदपत्रे सादर करतात.
  • केंदीय मंत्रालये आणि अर्थमंत्रालयातील खर्च विभागाच्या अधिका-यांमध्ये चर्चा होतात.
इंटरेस्ट गुप्स
शेतकरी, कर्मचारी संघटना, उद्योगपती, वित्तीय संस्था, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांशी अर्थमंत्रालयातील वित्त विभाग आणि महसूल विभागांचा चचेर्त सहभाग.
राज्य सरकारे
राज्य सरकारने मांडलेल्या मागण्या मूल्यमापनासाठी संबंधित अर्थविभागाक;डे पाठवल्या जातात.
अर्थ मंत्रालय
  • वित्त विभागाकडून खर्चाचा प्राधान्यक्रम ठरविणे.
  • महसूल संकलनाचा प्राधान्यक्रम महसूल विभाग ठरविते.
  • धोरणानुसार योजनांची निश्चिती करण्याचे काम वित्त विभाग करतो.
बजेट संमत कसे होते?
  • १९९९पासून बजेट फेबुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ वाजता सादर केले जाते. निवडणुकांच्या वषीर् मात्र नवे सरकार आल्यानंतरच बजेट सादर होते.
  • राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बजेट सेशनला सुरुवात.
  • अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतात.
  • अर्थमंत्र्यांचे बजेटवरील भाषण दोन भागांमध्ये विभागलेले असते. 'अ' विभागात देशाचे सर्वसाधारण आथिर्क सवेर्क्षण आणि धोरणे असतात. तर 'ब' विभागात करप्रस्ताव.
  • अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर राज्यसभेत 'वाषिर्क वित्तीय निवेदन' सादर केले जाते.
चर्चा
  • बजेट सादर केल्यानंतर लगेचच चचेर्ला सुरुवात होत नाही.
  • काही दिवसांनंतर लोकसभेत संपूर्ण बजेटवर दोन ते तीन दिवस चर्चा होते.
  • चचेर्च्या शेवटी अर्थमंत्री या चचेर्ला उत्तर देतात.
  • चालू आथिर्क वर्षातील दोन महिन्यांच्या खर्च तरतुदीसाठी संसदेच्या मंजुरी मिळावी यासाठी 'व्होट अॅन अकाउंट' घेतले जाते.
  • संसद ठराविक कालासाठी संस्थगित केले जाते.
  • यादरम्यान निधीच्या मागणींचा संबंधित स्टँडिंग कमिटीकडून विचार केला जातो.
मतदान
  • स्टँडिंग कमिटीने दिलेला अहवाल लोकसभेत सादर केला जातो. त्यावर चर्चा केली जाते आणि निधीच्या मागणीवर मतदान घेतले जाते.
  • बजेटबाहेरील विशेष मागण्यांवर मतदान घेण्यासाठी लोकसभाध्यक्ष त्या मागण्या संसदेत मांडतात. याचा फैसला केवळ मतदानानेच होऊ शकतो. या मागण्या लोकसभेतच मंजूर होतात. शिवाय, सरकारने तरतूद केलेल्या निधीची रक्कम कमी करण्याचा अधिकारही लोकसभेला आहे.
  • राज्यसभेतही बजेटवर सर्वसाधारण चर्चा होते. मात्र निधीच्या मागणीवर येथे मतदान होत नाही.
  • सर्वसाधारण चर्चा आणि निधींच्या मागणीवर मतदान झाल्यानंतर सरकार एक 'विनियोजन विधेयक' सादर करते. या विधेयकामुळे सरकारच्या तिजोरीतील निधी खर्च करण्याचा अधिकार सरकारला मिळतो.
बजेटपूर्व बैठका पार पडल्यानंतर करप्रस्तावावर अखेरचा हात फिरवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून बैठक बोलावली जाते. पंतप्रधानांशी चर्चा व नंतर 'कर प्रपोझल' निश्चिती.
बजेट बनवण्याची संपूर्ण जबाबदारी अर्थमंत्रालयावर असते. या मंत्रालयातील प्रत्येक विभागाकडे विशिष्ट जबाबदा-या दिलेल्या असतात.
  • खर्च विभाग
  • खर्च
  • वित्त विभाग
  • नॉन टॅक्स महसूल
  • महसूल विभाग
  • कर महसूल
  • तूट
बजेटची छपाई
  • बजेटची महत्त्वाची कागदपत्रे तयार करण्याचे काम बजेट विभाग करते. या विभागातीलच काही निवडक मंडळी बजेटलेè6;नाचा तपशील तयार करतात.
  • बजेट कागदपत्रांवरील सर्व तपशील काही निवडक अधिकारी आणि स्टेनोग्राफर बनवतात. त्यांचे कम्प्युटरही अन्य नेटवर्कपासून अलग केलेले असतात.
  • अर्थ मंत्रालयाकडून बजेट कागदपत्रांची सीडी छपाईसाठी दिली जाते.
  • बजेटच्या छपाईच्या कामात सहभागी असणारे सर्व अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा इतरांशी संपर्क होऊ दिला जात नाही. त्यांची सर्व व्यवस्था नॉर्थ ब्लॉकमध्ये केली जाते.
  • बजेटमधील 'टॅक्स अॅक्ट' तपासणाऱ्या कायदा मंत्रालयातील तज्ज्ञांनाही इतरांपासून अलगच ठेवले जाते.
  • बजेटचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये प्रसिद्धीपत्रक बनवण्याचे काम करणाऱ्या द प्रेस इन्फमेर्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनाही वेगळे ठेवले जाते.
  • अर्थमंत्र्यांनी लोकसभेत बजेट सादर केल्यानंतरच या सर्व अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर जाऊ दिले जाते.
  • या सर्व कामकाजात सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या हालचाली, फोन कॉल्सवर लक्ष ठेवणे आणि सर्व अधिकाऱ्यांची
  • सुरक्षेची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरोकडे असते.
  • अधिकाऱ्यांच्या सेल फोनच्या वापरावरही लक्ष ठेवले जाते आणि काही भागांत सेल फोन जॅमही केले जातात.
  • इथे सर्व इलेक्ट्रॉनिक स्टोरेज उपकरणांना मज्जाव असतो.

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान 60;ादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

पुढे वाचा >>>
बजेट का? कशासाठी?SocialTwist Tell-a-Friend

Monday, June 15, 2009

पतसंस्थांसाठी जारी महत्त्वाची परिपत्रके

साभार- विद्याधर अनास्कर/लोकसत्ता/express मनी/१५.०६.२००९

सहकार खात्यातर्फे पतसंस्थांसाठी जारी महत्त्वाची परिपत्रके-

राज्यामध्ये सुमारे १८,६२८ इतक्या पतसंस्था असून, त्यापैकी ४६२ नागरी सहकारी पतसंस्था या आर्थिक अडचणीत असल्याचा अहवाल सहकार खात्याने नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. वित्तीय बाजारात घडणाऱ्या घडामोडी व इतर वित्तीय संस्थांना लागू असणाऱ्या नियमांचा अभ्यास करून, पतसंस्थांना सध्याच्या आर्थिक घडामोडींशी जुळवून घेता यावे म्हणून सहकार खात्याने राज्यातील पतसंस्थांसाठी अलीकडेच पाच नवीन परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. त्यांचा हा आढावा......

१) ठेवी व कर्जावरील व्याजदर स्वतंत्रपणे ठरविण्यास पतसंस्थांना स्वातंत्र्य

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेव व कर्जावरील व्याजाची तीव्र स्पर्धा टाळण्यासाठी नागरी सहकारी पतसंस्थांच्या आदर्श उपविधींमध्ये बदल करून कर्जावरील व्याजदराची कमाल मर्यादा ही १६ टक्के व ठेवींवरील व्याजदराची कमाल मर्यादा ही १३ टक्के निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर ही मर्यादा १५ टक्के व ११ टक्के इतकी करण्यात आलेली होती. परंतु पतसंस्थांच्या फेडरेशन व विविध पातळय़ांवरील असोसिएशन्स यांनी विनंती केल्यानुसार सहकार खात्याने आपल्या १२/११/२००८च्या परिपत्रकानुसार राज्यातील नागरी/ग्रामीण बिगरशेती/ सेवक सहकारी पतसंस्थांना त्यांच्या ठेवी व कर्जावरील व्याजदर ठरविण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिले असून, असे व्याजदर ठरविताना संस्थेच्या कर्जावरील सरासरी दर व ठेवींवरील सरासरी दर यांमध्ये तीन टक्के दुरावा (margin) ठेवण्याच्या सूचना पतसंस्थांना देण्यात आलेल्या आहेत. पतसंस्थांमध्ये यासंबंधात एकच पद्धत अवलंबण्यात येऊन निर्णयप्रक्रियेत सुसूत्रता येण्यासाठी या परिपत्रकात ठेवींचा व कर्जाचा सरासरी दर, दुरावा, ठेवींची व कर्जाची सरासरी काढण्याच्या पद्धतीही दिलेल्या आहेत. त्यानुसार-

ठेवींचा सरासरी दर (Average Borrowing Rate) = वर्षभरात ठेवींवर दिलेले व्याज भागिले/ वर्षभरातील ठेवींची सरासरी x १००.
तसेच, कर्जाचा सरासरी दर (Average Ending Rate) = वर्षभरात कर्जावर मिळालेले व्याज भागिले/ वर्षभरातील कर्जाची सरासरी x १००.
असे सूत्र दिले आहे. या दोन्हींमधील फरक म्हणजे दुरावा (spread) हा तीन टक्के असावा, असे शासनाने सुचविले आहे. या दुरावा रकमेतून प्रशासकीय खर्च वजा केल्यास पतसंस्थेचा निव्वळ नफा निघत असल्याने व बँकिंगमधील आदर्श प्रमाणांनुसार नफ्याचे प्रमाण किमान एक टक्का इतके असणे आवश्यक असल्याने, पतसंस्थांना आपला प्रशासकीय खर्च दोन टक्क्यांच्या आतच ठेवणे आवश्यक आहे. वरील सूत्रांसाठी वर्षभरातील ठेवींची सरासरी काढत असताना वर्षभरात जनरल लेजरप्रमाणे दर महिनाअखेरील सर्व ठेवींची एकत्रित बेरीज भागिले १२ हे सूत्र असून वर्षभरातील कर्जाची सरासरी काढताना वर्षभरात जनरल लेजरप्रमाणे दर महिना अखेरील सर्व कर्जाची एकत्रित रक्कम भागिले १२, हे सूत्र वापरायचे आहे. याप्रमाणे निश्चित केलेल्या व्याजदरानुसार निधी उपलब्ध करताना, म्हणजेच ठेवी स्वीकारताना महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम १९६१चे नियम ३५मधील तरतुदींचा भंग होणार नाही, म्हणजेच संस्था त्यांच्या स्वनिधीच्या (भांडवल + राखीव निधी) १० पटींपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी स्वीकारणार नाही याची दक्षता संस्थेने घ्यावयाची आहे. या परिपत्रकात पुढे असेही सुचविण्यात आलेले आहे, की अशा प्रकारे ठेवी व कर्जावरील व्याजदर निश्चित करताना ते जिल्हय़ातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन टक्क्यांनी किंवा इतर राष्ट्रीयीकृत/ सहकारी बँकेच्या व्याजदरापेक्षा एक टक्क्यापेक्षा अधिक नसावेत, याची दक्षता संबंधित पतसंस्थेने घ्यावयाची आहे. या संदर्भात पतसंस्थांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत का नाही, यासंबंधात तपासणी करून अहवाल देण्याचे काम या परिपत्रकात लेखापरीक्षकांवर सोपविण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या परिपत्रकात नमूद केलेल्या आदर्श प्रमाण व विविध सूत्रांच्या आधारे आर्थिक कोष्टके मांडून आपले ठेवी व कर्जावरील व्याजदर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य पतसंस्थांना दिलेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

२) अडचणींतील नागरी पतसंस्थांना तरलता संपुष्टात आल्यामुळे ठेवी परत करण्यावर र्निबधाबाबत.

या संदर्भात शासनाच्या सहकार विभागाने दिनांक १७ नोव्हेंबर २००८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे, की सद्यस्थितीत अनेक पतसंस्थांमधील तरलता (liquidity) संपुष्टात आल्यामुळे त्या मागणीनुसार ठेवींची रक्कम परत करू शकत नाहीत. किंबहुना ठेवीदारांनी मोठय़ा प्रमाणावर ठेवी काढल्याने अनेक पतसंस्थांमधील तरलता धोक्यात येऊन त्या अडचणीत आलेल्या आहेत. यामुळे ज्याप्रमाणे आर्थिक अडचणींतील नागरी बँकांना वाचविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक त्यांच्या ठेवी परत करण्याच्या मर्यादावर नियंत्रण आणते व त्यामुळे नागरी बँकांच्या ठेवीदारांवर पैसे काढण्यावर नियंत्रण येऊन त्यांची तरलता राखली जाते व बँका वाचतात, त्याचप्रमाणे तरलता धोक्यात आलेल्या पतसंस्थांवरदेखील शासनातर्फे अशा प्रकारे नियंत्रण आणल्यास, पतसंस्थांमधून रक्कम काढून घेण्यावर नियंत्रण आल्याने पतसंस्थांमधील तरलता राखली जाऊन, त्या धोक्यापासून वाचतील अशा प्रकारे पतसंस्थांच्या फेडरेशन्स व असोसिएशन्स यांनी विनंती केल्यानुसार शासनाने या परिपत्रकालारे असे सूचित केले आहे, की ज्या पतसंस्थांमधील तरलता धोक्यात आली असेल, त्यांनी आपल्या स्तरावरील निबंधकास, अशी मागणी करणारा प्रस्ताव सादर केल्यास, तो आपल्या वरिष्ठांकडे सदर प्रस्ताव तपासून शिफारशीसह पाठवायचा आहे. याचा अर्थ संस्था तालुका क्षेत्रातील असल्यास जिल्हा उपनिबंधक, जिल्हास्तरावरील असल्यास विभागीय सहनिबंधक व विभागीय सहनिबंधक स्तरावरील असल्यास सहकार आयुक्त कार्यालय व सहकार आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरील असल्यास राज्य शासनाकडे सदर प्रस्ताव शिफारशींसह सादर केला जाईल. अशा प्रकारे तरलतेमुळे अडचणीत असलेल्या परसंस्थांवरील रक्कम देण्याच्या मर्यादेवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या स्तरावर एक कमिटी असेल व अशा कमिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे काम पाहतील. तसेच कमिटीच्या इतर सदस्यांमध्ये पतसंस्था फेडरेशनचा एक प्रतिनिधी, सहायक निबंधक व विशेष लेखापरीक्षक हे काम पाहतील. सदर समिती प्रत्येक प्रकरणाचा निर्णय गुणवत्तेवर घेईल. या समितीच्या शिफारशींनुसार संबंधित निबंधकाने पुढील कार्यवाही करावयाची आहे. त्यामध्ये जर अशी संस्था ही विभाग व राज्यस्तरावरील असल्यास अशा संस्थेचे मुख्यालय ज्या जिल्हय़ाच्या ठिकाणी आहे, त्या जिल्हय़ाच्या स्तरावरील समिती ही आवश्यकतेनुसार याबाबत सविस्तर प्रस्ताव त्यांचे स्वयंस्पष्ट अभिप्रश्नयासह पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी संबंधित निबंधकास सादर करील. सदर उपाययोजना ही सध्या अडचणीत असलेल्या पतसंस्थांना लागू होणार नसून जी नागरी/ग्रामीण/ बिगरशेती पतसंस्था ठेवीदार ठेवी काढत असल्याने तरलता संपुष्टात येऊन अडचणीत येण्याची शक्यता आहे, अशा पतसंस्थांनाच वरील उपाययोजना लागू होईल.

अशा प्रकारे पतसंस्थांवर अथवा बँकांवर ज्या वेळी नियंत्रण आणले जाते, त्या वेळी पैसे काढण्याच्या मर्यादेवर बंधने आल्याने साहजिकच ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरते. परंतु असे र्निबध हे ठेवीदारांच्या हितासाठीच असल्याने ठेवीदारांनी अशा वेळी संयम बाळगणे आवश्यक आहे. बँका अथवा पतसंस्था या त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवींपैकी ३० टक्के ठेवी स्वत:कडे ठेवून ७० टक्के ठेवी या कर्जवाटपासाठी वापरत असतात. याचाच अर्थ जोपर्यंत ठेवीदार हे ३० टक्केपर्यंत ठेवीची रक्कम काढत असतात, तोपर्यंत ती देण्याची क्षमता आर्थिक संस्थांमध्ये असते. परंतु ज्या वेळी ही मागणी ३० टक्केपेक्षा जास्त होते, त्या वेळी संस्थांनी तो पैसा कर्जरूपाने वाटला असल्याने व तो लगेच उपलब्ध होऊ शकत नसल्याने संस्थांना ठेवीदारांच्या मागणीनुसार रक्कम देता येत नाही. अशा वेळी कर्जाऊ वाटलेली रक्कम उपलब्ध होईपर्यंत अशा संस्थांमधून रक्कम काढण्यावर र्निबध टाकले जातात व जशी जशी रक्कम उपलब्ध होईल, तसे तसे हे र्निबध उठविले जातात. अशा प्रकारे ठेवीदारांच्या भल्यासाठीच हे र्निबध असल्याने अशा परिस्थितीत ठेवीदारांनी संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- विद्याधर अनास्कर
   v_anaskar@yahoo.com

पुढे वाचा >>>
पतसंस्थांसाठी जारी महत्त्वाची परिपत्रकेSocialTwist Tell-a-Friend

कांचनमृग वेळीच हेरायचे असतात!

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, चर्चा झाल्यावर संसदेचे अधिवेशन आता २९ जूनपर्यंत स्थागित झाले आहे. जुलैमध्ये सुरू झाल्यावर रेल्वेचा व केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाईल व ३१ जुलैपर्यंत तो मंजूरही होईल. आता पुन्हा अपेक्षांचे पेव फुटेल व बाजार वर जात राहील. तत्पूर्वी एक चुणूक म्हणून गेल्या सोमवारी निर्देशांक ४३७ अंशानी खाली आला आणि मंगळवारी ४६१ अंशांनी वरही गेला. सोमवारी पुन्हा खरेदीची संधी अनेकांना मिळाली.
अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षांचे ओझे या शासनाला पेलणारे नाही याची पुन्हा स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
डाव्यांच्या कुबडय़ा गेल्या तरी आघाडीला लंगडे करण्याचे काम आता आतलेच दोन घटक पक्ष करीत आहेत. एका पक्षाला घराणेशाही सांभाळत असता, देशाची प्रतिमा समाजवादी असल्याची जाणीव झाली आहे व निर्निवेशनाला त्याने विरोध दर्शवला आहे. तर पेट्रोल पदार्थाच्या किंमती निर्धारीत न ठेवण्याच्या शक्यतेवर दुसया पक्षाने नाखुषी दर्शवली आहे. गेल्या जूनमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ‘शेंडी तुटो वा पारंबी तुटो’ अभिनिवेशाने लढलेल्या नेत्यांचा  निर्धार या विरोधापुढे किती टिकेल हे पुढील दोन महिन्यात कळेल.
अर्थसंकल्पात सर्वसमावेशकता (Inclusiveness) आणण्यासाठी रोजगार योजना, आवास योजना, भारत निर्माण, सर्व शिक्षा अभियान या गुळगुळीत योजनांचे मोठे साह्य़ असेल. नेमक्या याच योजनांसाठी ३,३०,००० कोटी रुपयांचा महसूल हवा आहे. म्हणूनच जनतेला समभाग विकायला हवेत. आता वित्तीय तूट कमी करण्यासाठी, पेट्रोल कंपन्यांना तेल रोखे द्यायला लागू नयेत, म्हणून थोडी सुधारणा तिथे करणे आवश्यक आहे, असे ठाम सांगून शासन या दोन्ही गोष्टी करू शकते. ती तळमळ हवी. सामथ्र्य आहे. तळमळीचे। जो जे सांगील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।। असंच याबाबत आम आदमीही म्हणेल. ही तळमळ सगळीकडे हवी पण ती तशी नाही हे अर्थमंत्र्यांच्या बँक प्रमुखाबरोबरच्या १० जूनच्या बैठकीनंतर दिसून आले आहे. ठेवींचे दर वर आहेत या सबबीखाली बँका अजूनही व्याजदर कमी करायला तयार नाहीत. व त्यांची शेपटी शासन, रिझव्‍‌र्ह बँक पिळू शकत नाही. हे आजवर दिसले आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर करून कुणीतरी कुठल्या विविध दरांना कर्जे व ठेवी आहेत हे विचारले पाहिजे. बँकांचे आजचे नफे बघता बँका सर्वोत्तम व्याजदर १० टक्क्य़ावर सहज आणू शकतील.
सुदैवाने विरोधीपक्षातील भाजप नेहमीच सुधारणावादी असल्याने, यूपीए आघाडीतील वरील दोन्ही पक्षांची ३७ मते मिळाली नाहीत तरीही शासनाला धोका असणार नाही.
शेअरबाजारावर राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडी, नैसर्गिक आपत्ती वा पावसाळ्यासारखे घटक काम करीत असतात. तरीही यांचा त्यामानाने परिणाम न होणारे संरक्षक (Defensive) शेअर्समध्ये गुंतवणूक असली तर निवेशकांना तशी जोखीम नसते.
१६ मे पूर्वी अस्थिर शासन होते. त्यावेळीही या सदरात लक्ष्मीची पावले कुठे दिसतील त्याचा सतत ऊहापोह करताना, अशा शेअर्समध्ये लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील, सेंच्युरी टेक्सस्टाईल्स, बॉम्बे डाईंग, स्टेट बँक, पेनिन्सुला लँड, युनिटेक, शिववाणी ऑईल अशांचा सतत पाठपुरावा होता. आज शासन स्थिर असल्याने त्याचे भाव कसे वाढले आहेत ते पुढील आकडय़ांवरून दिसेल. पण जर त्रिशंकू लोकसभा असती तरीही १६ मे पूर्वीच्या भावात घसरण दिसली नसती हेही निर्विवाद आहे. हे शेअर्स आजही over-value वाटले, तरी विक्रीची घाई नसावी. कारण हे हातातून हरणासारखे निसटले की पुन्हा हाती लागणे कठीण असते. असे कांचनमृग वेळीच पकडायचे असतात.
सत्यम कॉम्प्युटर्सने डिसेंबर २००८ च्या तिमाहीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार तिला २००० कोटी रुपयापेक्षा थोडी जास्त झालेल्या विक्रीवर १८१ कोटी रुपये नफा झाला आहे. ही तिमाही राजू बंधूंनी जानेवारीत महाघोटाळा जाहीर केला त्याच्या आधीची आहे. या आकडय़ांची विश्वसनीयता अजून सिद्ध व्हायची असली तरी या नफ्याप्रमाणेच जर वर्षभर नफा झाला तर सत्यम कॉम्प्युटर्सच्या भावात वाढ होईल. सध्या हा भाव ८० रुपयांच्या वर आहे. टेक महिंद्राने ५८ रुपयाला ३१ टक्के नवीन शेअर्स घेतले आहेत आणि आणखी सक्तीच्या २० टक्के शेअर्ससाठी अन्य भागधारकांना त्याच भावाने पुनर्खरेदीचा देकार दिला आहे. सध्याचा भाव कितीतरी बरे असता. कुणीही भागधारक या देकाराला आपले शेअर्स देणार नाहीत.
सत्यमचा कलंकित शेअर, २२ ते ३२ रुपयाला असताना अनेकांना तो निवेशनीय वाटत होता तरी तो घेऊ नये असेच माझे मत होते. त्याऐवजी २३ मार्च २००९ च्या लेखात, टेक महिंद्र २७० रुपयाला मिळत आहे. तो घ्यावा कारण त्यावेळी तो ३.६ पट किं./उत्पन्न गुणोत्तराला मिळत होता. टेक महिंद्र घेतला की सवत्स धेनु पदरात पडणार होती. कारण टेक महिंद्र सत्यम कॉम्प्युटर घेण्याबद्दल लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोपेक्षाही जास्त आक्रमक होती व त्या भावात, सत्यममुळे होणारा फायदा समाविष्ट होता. आज टेक महिंद्र ८०० रुपयांवर गेला आहे. २७० रुपयानंतरही ३००-३२५ रुपये भावाला ज्यांनी टेक महिंद्र घेतला असेल त्यांना आज पावणेतीन पट भांडवल झालेले दिसेल.
आता बहुतेक शेअर्स खरेदीसाठी हाताबाहेर गेले असले तरी मंगलोर रिफायनरीज् व युनिटेक जर ८५ रुपयांच्या मागेपुढे मिळाले तर खरेदी योग्य आहेत. मात्र त्यात लक्षणीय वाढ दिसण्यासाठी वर्षभर थांबायची तयारी हवी.
अर्थसंकल्पात उद्योगक्षेत्रासाठी काही ‘स्टिम्युलस’ असेल अशी शक्यता योजना आयोगाच्या डॉ. माँटेक अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे. ते ‘स्टिम्युलस’ आले व सिक्युरिटी ट्रान्झँक्शन कर जर कमी झाला तर बाजारातला उत्साह वाढेल.
-वसंत पटवर्धन(फोन : ०२० २५६७०२४०)

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

पुढे वाचा >>>
कांचनमृग वेळीच हेरायचे असतात!SocialTwist Tell-a-Friend

Saturday, May 23, 2009

सेन्सेक्स व इतर निर्देशांक

सेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्स या शब्दप्रयोगाचे लघुरुप आहे. त्याचा मराठीतील अर्थ म्हणजे संवेदी निर्देशांक.
हा निर्देशांक भारतीय शेअर बाजारातील एक प्रमाणभूत निर्देशांक आहे.

आता निर्देशांक म्हणजे काय हे समजावण्यासाठी या निर्देशांकाचे काय काम आहे ते जाणून घेऊ.

निर्देशांकाचे काम एकच आणि ते म्हणजे किंमतीमधील चढउतार सूचित करणे. मग जर एखादा निर्देशांक समभागाधारित असेल तर तो समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. या उलट एखादा निर्देशांक बाँड्स वर आधारित असेल तर तो बाँडच्या किमतीमधील चढउतार सूचित करतो.

सेन्सेक्स हा निर्देशांक मुंबई बाजारातील समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. जेव्हा आपण सेन्सेक्स वर गेला असे म्हणतो तेव्हा शेअरबाजारामधील शेअर्सच्या किमती वाढलेल्या असतात. समभागांच्या किमती या नेहमीच त्या कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचे द्योतक असतात असे म्हटले जाते. त्यामुळे समभागाची वाढणारी किंमत म्हणजे कंपनीच्या भविष्यातील कामगिरीची खात्री असे समीकरण मांडले जाते. यावरुन सेन्सेक्स वाढतो तेव्हा एकंदर कंपन्यांच्या भविष्यातील कामगिरीबाबत बाजाराची खात्री आणि एकूण अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र आहे असे मानले जाते.

सेन्सेक्स म्हणजे ३० शेअर्स. होय! फक्त ३० शेअर्स तुम्हाला बाजाराची एकूण दिशा सांगतात.
तुम्ही म्हणाल केवळ ३० शेअर्स संपूर्ण बाजाराची दिशा कसे सांगतील?
तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे.
हे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात. मुंबई बाजारातील निम्म्याहून अधिक भांडवल हे या शेअर्समध्ये असते. शिवाय हे शेअर्स १३ हून अधिक सेक्टर्सचेही प्रतिनिधित्व करतात.

निर्देशांकातील शेअर्स निवडण्यासाठी साधारण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे:
समभागामध्ये कामाच्या प्रत्येक दिवशी व्यवहार होणे आवश्यक आहे.
गेल्या एक वर्षात सरासरी उलाढालींच्या संख्येमध्ये तसेच व्यवहाराच्या किंमतीमध्ये (विक्री किंवा खरेदी) हा समभाग पहिल्या १५० कंपन्यांमध्ये असणे गरजेचे आहे.
मुंबई शेअर बाजारात हा समभाग व्यवहारासाठी किमान एक वर्षापूर्वी नोंदणी झालेला असावा.

याचप्रमाणे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक असून त्यामध्ये ५० समभागांच्या किमतीचे चढउतार निर्देशित होतात. नॅशनल + फिफ्टी = निफ्टी असे सूत्र आहे.

याच धर्तीवर
बीएसई १००, बीएसई ५०० असे सर्वसमावेशक निर्देशांक तर
बँकेक्स, बीएसई आयटी हे सेक्टोरल निर्देशांक आणि
मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक हे भांडवलावर आधारित निर्देशांक आहेत.

सेन्सेक्सविषयी अधिक माहिती येथे वाचता येईल.
निफ्टीविषयी अधिक माहिती येथे वाचता येईल.

भारतातील सेन्सेक्स व निफ्टी प्रमाणेच अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल ऍवरेज, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँग सेंग, सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स इंडेक्स, कोरीयाचा कोस्पी इंडेक्स ह्या लोकप्रिय निर्देशांकांवर लक्ष ठेवले जाते.

ब्रोकरेज
आपली व्यवहाराची क्षमता व तयारी यानुसार ब्रोकरेज आकारणी केली जाते. खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुमच्या डीमॅट खात्यात हवे असतील (डिलिव्हरी) तर साधारण व्यवहाराच्या ०.५% ते ०.८% पर्यंत ब्रोकरेज द्यावे लागते. लिया-दिया प्रकाराच्या सट्टेबाजी व्यवहारामध्ये (ट्रेडिंग) एकूण किंमतीऐवजी "उक्ते" (लंपसम) ब्रोकरेज उदा. एका व्यवहाराला समजा ५ रुपये असे ब्रोकरेज आकारले जाते.
या क्षेत्रात नव्याने उतरलेल्या रिलायन्स मनी सारख्या कंपन्या जम बसवण्यासाठी २०० रुपये ब्रोकरेजमध्ये कितीही व्यवहार करा अशा पद्धतीच्या आकर्षक योजना आणतात.
किती ब्रोकरेज द्यायचे असा काही नियम नसला तरी वर उल्लेख केलेल्या डिलिवरी प्रकारामध्ये ब्रोकरेज + सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मिळून १ टक्क्यापर्यंत खर्च अपेक्षित धरावा.

म्हणजे १०० रुपये व्यवहारावर (खरेदी किंवा विक्री) ब्रोकरेज + सेक्युरिटी टॅक्स + सर्विस टॅक्स असा १ रुपये खर्च होईल असे समजावे.

ऑनलाईन ब्रोकर्स उदा. इंडिया इंफोलाईन, आयसीआयसीआय डायरेक्ट, कोटक व शेरखान सारख्या कंपन्यांचे ब्रोकरेज हे थोडेसे जास्त असते. कारण तुम्हाला देण्यात येणारी व्यवहाराची सुलभता. याउलट कागदोपत्री व्यवहार करणार्‍या स्थानिक ब्रोकर्सचे ब्रोकरेज कमी असते.

पोर्टफोलिओ

आपला पोर्टफोलिओ बनवताना नेहमी दोन गोष्टींचा विचार करावा:

१. जोखीम घेण्याची क्षमता-ताकद (कपॅसिटी)
२. जोखीम सहन करण्याची तयारी (टॉलरन्स)

जोखीम घेण्याची क्षमता ही तुमच्या वयावर, तुम्ही कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यात पार पाडत असलेल्या जबाबदारीवर, तुमच्या आर्थिक आरोग्यावर अवलंबून असते तर जोखीम सहन करण्याची तयारी ही एक मानसिक वृत्ती आहे.
या दोन्हींच्या संयोगाचा तुमच्या पोर्टफोलिओवर अतिशय प्रभाव पडतो.
प्रत्येक व्यक्तीसाठी हे दोन गुणधर्म वेगळे असल्यामुळे एका व्यक्तीसाठी उत्तम असलेली गुंतवणूक ही दुसर्‍या व्यक्तीसाठी उत्तम असेलच असे नाही.

हे दोन्ही गुणधर्म जर तुमच्या बाजूने असतील उदा. जोखीम घेण्याची अधिक क्षमता व पैसे गेले तरी चालतील अशी मानसिक वृत्ती तर अधिक जोखीम व पर्यायाने अधिक परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. याउलट असेल तर कमी जोखीम व त्यामुळे कमी परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.

तुम्ही अतिशय मुलभूत प्रश्न विचारल्यामुळे सावधानताचा इशारा म्हणून येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळतोच मिळतो असे नाही. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळण्याची शक्यता फक्त वाढते.

पोर्टफोलिओ तयार करताना वर दिलेला "क्षमता" हा गुणधर्म ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्याचा विचार करावा. जर तुम्ही अविवाहित, तरुण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असाल व पुढील काही वर्षे तरी शिल्लकीत टाकत असलेले पैसे वापरण्याची काहीही गरज नाही असे वाटत असेल तर समभाग किंवा त्यापेक्षा उत्तम म्हणजे समभागाधारित म्युच्युअल फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. याउलट जर पैशाची निकड नजीकच्या भविष्यात लागेल असे वाटत असेल तर बाँड/डेट आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी.

थेट समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास आधी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्राचा थोडासा अभ्यास करावा.
सध्या तेजीत असलेल्या क्षेत्रामधील वाईट कंपन्याही चांगला परतावा देतात तर सध्या साडेसाती असलेल्या क्षेत्रामधील अतिशय चांगल्या कंपन्या लाखाचे बारा हजार करु शकतात हे ध्यानात ठेवावे.
उदा. सध्या रुपया तेजीत असल्यामुळे डॉलरच्या विनिमयदरावर फायदा आधारित असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्राचे बूच लागलेले आहे. त्यामुळे इन्फोसिस सदृश कंपन्या ह्या कितीही चांगल्या असल्या तरी क्षेत्राला चांगले दिवस नाहीत. याउलट क्यापिटल गुड्स, ऊर्जा क्षेत्राला सरकारी सवलती मिळत असल्यामुळे तसेच बांधकामे करणार्‍या क्षेत्रालाही चांगले दिवस असल्यामुळे ही क्षेत्रे चांगली आहेत. बांधकाम करणार्‍या क्षेत्रावर अवलंबून असेलेले सीमेंट क्षेत्रही चांगले वाटेल. मात्र सीमेंटच्या किमती नियंत्रित करण्याच्या सरकारच्या धरसोड धोरणामुळे तेथे काहीही होऊ शकते. साखरेचीही तशीच गत आहे. अशा प्रकारचा जुजबी अभ्यास प्रत्येक क्षेत्राबद्दल ठेवावा.

एकदा कोणती क्षेत्रे निवडायची हे ठरले की त्यात्या क्षेत्रामधील अग्रगण्य व फायदेशीर कंपन्या शोधून त्यांचा थोडासा अभ्यास करावा. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी किती फायदा कमावला आहे. पुढे कितपत फायदा कमावतील याबाबत त्यांची दिशा कशी आहे हे पहावे. एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांचे फायदे व शेअरची किंमत यांचे गुणोत्तर तपासून कोणती कंपनी घेण्यास स्वस्त आहे हे पहावे.

सर्किट ब्रेकर्स
सर्किट ब्रेकर्स हा सेबीने गुंतवणुकदारांचे पैसे वाचवण्यासाठी आणलेला उत्तम मार्ग आहे.
१७ मे २००४ चा काळदिवस आठवा. भाजपाचे सरकार पडल्यामुळे बाजारातील खेळाडुंनी मार्केट जोरदार सटकवले होते. किंवा परदेशी गुंतवणूकदारांनाही कर द्यावा लागेल अशी पुडी अर्थमंत्र्यानी सोडल्यामुळेही गेल्या वर्षी मार्केट आपटले होते. अशा प्रसंगी हे सर्किट ब्रेकर्स मदतीला येतात.

बाजारात प्रमुख घटक हा मनुष्य असल्यामुळे मनुष्यस्वभावाचे मुख्य पैलू - लोभ आणि भीती येथे पाहायला मिळतात. वर सांगितलेल्या प्रसंगांसारख्या घटना घडल्या की अर्थशास्त्राचे मूलभूत नियम विसरुन भावनांवर स्वार झालेले खेळाडू मग जोरदार खरेदी किंवा विक्री सुरु करतात आणि पर्यायाने बाजार भरमसाट वधारतो किंवा सपशेल आपटतो. अशा प्रसंगी थोडा वेळ व्यवहार बंद करुन शांत डोक्याने विचार करण्यातच शहाणपणा असतो हे सूत्र आहे. त्यामुळे अशी असाधारण वाढ किंवा घट दिसली की सर्किट ब्रेकर्स लागतात.

बाजारात दोन प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत.

१. संपूर्ण बाजार/सेन्सेक्स/निफ्टी सर्किट ब्रेकर
२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर

संपूर्ण बाजाराचा सर्किट ब्रेकर हा उपरोल्लिखित घटनांमध्ये वापरला गेला आहे. तो लागू होण्याचे नियम साधारणतः असे.

अ. निर्देशांकामध्ये १० टक्क्याची वाढ किंवा घट.
    दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : १ तास व्यवहार बंद
    दुपारी १ ते २.३० मध्ये झाल्यास : अर्धा तास व्यवहार बंद
    २.३० नंतर झाल्यास: : व्यवहार सुरु राहतात.

ब. निर्देशांकामध्ये १५ टक्क्याची वाढ किंवा घट.
    दुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : २ तास व्यवहार बंद
    दुपारी १ ते २.०० मध्ये झाल्यास : १ तास व्यवहार बंद
    २.०० नंतर झाल्यास : व्यवहार दिवसभरासाठी बंद.

क. निर्देशांकामध्ये २० टक्क्याची वाढ किंवा घट.
    दिवसभरात केव्हाही : व्यवहार दिवसभरासाठी बंद

२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर:
यामध्ये प्रत्येक शेअरच्या किमतीच्या चढ-उताराची मर्यादा निश्चित केली जाते. याला अपवाद म्हणजे सेन्सेक्स मध्ये अंतर्भूत असलेल्या ३० शेअर्सना व निफ्टीमधील ५० शेअर्सना कोणताही स्वतंत्र सर्किट ब्रेकर नाही. मात्र इतर सर्व शेअर्सना स्वतंत्र/वैयक्तिक सर्किट ब्रेकर आहे.

शेअरचा सर्किट ब्रेकर या प्रत्येक दिवशी बाजारामध्ये जाहीर केला जातो. साधारण २%, ५%, १०% २०% अशा प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत. शेअर बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळांवर व्यवहाराच्या दिवशी प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर समजू शकतो.

ता.क.
१८ मे २००९ सोमवारी डाव्या पक्षांचा 'लगाम' नसलेले, डॉ. मनमोहन सिंग यांना 'फ्री हॅण्ड' असलेले यूपीए सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने शेअर बाजाराने अभूतपूर्व २१११ अंशांची उसळी घेत या सरकारला विक्रमी सलामी दिली. 
एकाच दिवशी दोन हजारांनी सेन्सेक्स उंचावण्याची तसेच सौदे सुरू होताच अप्पर सकिर्ट ब्रेकर लागून ते थांबवले जाण्याची शेअर बाजाराच्या इतिहासातील हि पहिलीच वेळ होती.
या दिवशी सेन्सेक्समध्ये २१११ अंशांनी वाढ होऊन तो १४,२८४ वर बंद झाला तर एनएसईच्या निफ्टीत ६५१ अंशांची भर पडून तो ४३२३ वर स्थिरावला. सकिर्ट बेकर लावून तेजीला चाप लावण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याने दुपारी १२ नंतर सौदे थांबवण्यात आले. यापूर्वी २५ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स ११३९ अंशांनी वाढला होता.

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....

जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा

पुढे वाचा >>>
सेन्सेक्स व इतर निर्देशांकSocialTwist Tell-a-Friend

Sunday, May 17, 2009

सोमवारी शेअर बाजार उसळणार!

विलास महाजन /सकाळ/१६.०५.२००९

सोमवारी निफ्टी ३७५० कदाचित ३८०० अंशांची पातळीही ओलांडणार. सेन्सेक्‍स १२ हजार पाचशे अंशांना धडक मारणार. युतीच्या बाजूने मतदारांचा कौल पडल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आणि गुंतवणूक क्षेत्राने सोमवारची सुरवात तेजीने होण्याची गणिते बांधले आहेत. मंदीवाल्यांची नाकाबंदी होऊन तेजीचा वेग वाढणार असल्याची दलाल स्ट्रीटवर हवा निर्माण झाली आहे. ही तेजी टिकाऊ ठरते का, आठवड्यात उत्तर मिळायला हवे. बाजाराला आधीच अंदाज गुरुवारी वेगवेगळ्या वाहिन्यांनी युतीकडे झुकलेले निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले, तेव्हाच तेजीकडे बाजार झुकला. त्यालाधरून शुक्रवारी सेन्सेक्‍स दिवसभरात तीनशे अंशांहून अधिक अंसांनी वाढला. त्याअगोदर तेजी-मंदीच्या उलट-सुलट प्रभावात बाजार गटांगळ्या खात होता. मात्र निफ्टी ३५५० (सेन्सेक्‍स अकरा हजार) खऱ्या अर्थाने तुटलेला नाही. परकी गुंतवणूकदारांनी आठवड्याच्या सुरवातीलाच आक्रमक खरेदी करून स्थिर सरकार येण्याचा अंदाज बांधला होता. त्याचा अनुकूल परिणाम झाला. आठवड्यात सेन्सेक्‍स अडीच टक्‍क्‍यांनी आणि निफ्टी दीड टक्‍क्‍यांनी वाढले. सेन्सेक्‍स बारा हजार अंशांच्या पुढे बारा हजार १७३ अंशांवर बंद झाला. निफ्टी ३७०० अंशांच्या उंबरठ्यावर ३६७१ अंशांवर आहे. बॅंक शेअरला मागणी बॅंकिंग उद्योग अलिकडे बाजाराचा लाडका आहे. बीएसई बॅंक निर्देशांकाने आठवड्यात सहा टक्‍क्‍यांनी वाढ दाखविली. येस बॅंक आणि कोटक बॅंक १८ टक्के, आयसीआयसीआय बॅंक साडेदहा टक्के आणि एचडीएफसी बॅंक बारा टक्‍क्‍यांनी वर गेले. बराक ओबामा आऊटसोर्सिंगच्या विरोधाच्या हाकाटीकडे काणाडोळा करीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानेही तेजीचा पवित्रा घेतला. विप्रो साडेसहा टक्के, इन्फोसिस पाच टक्के आणि पटणी कॉम्प्युटर्स तब्बल २२ टक्‍क्‍यांनी वर गेले. माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडे नव्या मोठ्या ऑर्डर्स येत असल्याचा फायदा त्या क्षेत्राला मिळतो आहे. डॉल्फिन ऑफशोअर आणि ऍबन ऑफशोअरने आठवड्यात ३४ टक्के वाढ दाखविली. त्यापाठोपाठ एस्सार शिपिंगही २२ टक्‍के वाढला. कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची आणि त्यामधून उत्खनन व्यवसाय दोर धरण्याची बाजाराची अपेक्षा त्यामुळे स्पष्ट होते. पण, त्याचवेळी केर्न आणि ओएनजीसी आठवड्यात सुमारे आठ टक्के पडले. जिंदाल सॉ पाइप्स १८ टक्के, नाल्को १५ टक्के, रणबक्षी १३ टक्के, सिमेन्स साडेदहा टक्के हे या आठवड्यात नवी खरेदी बघणारे शेअर. निर्यात घटूनही तेजी आठवड्याच्या वाटचालीचा एकूण विचार करता, बाजारातला आत्मविश्‍वास वाढतो आहे. त्या मानसिकतेत प्रतिकूल घटनातही सकारात्मक भविष्य बघण्याचा सध्याचा कल आहे. औद्योगिक उत्पादनातही गेल्या १६ वर्षांतील वेगवान पडझड मार्च २००९ मध्ये बघायला मिळाली. ओळीने सात महिन्यांत निर्यात खालावते आहे. मंगळवारी हे जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्‍सने त्या दिवशी ४७५ अंशांची झेप घेतली. सट्टेबाजी आघात पचविणार? बाजारातला एक मोठा वर्ग राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सर्थक होता. भारतीय जनात पक्षाच्या नेतृत्त्वाखालचे सरकार येणार नाही त्याचा राग काढण्यासाठीही येत्या आठवड्यात त्यांच्या कडून बाजार पडण्याचा प्रयत्न होतो आहे का, ते बघायचे. तरीही बाजारातली उभी सट्टेबाजी बघता बाजार त्या विक्रीला पचवू शकेल असाच रंग दिसतो. युतीलाच पुढची पाच वर्षे मिळणार असल्याने संधीचीच धोरणे यापुढेही कायम राहतील. त्यामुळे नव्या अपेक्षांचे पाठबळ बाजाराला मिळणार नाही. या पार्श्‍वभूमीवर बाजार १० हजार ५०० ते तेरा हजार अंशांच्या दरम्यान पुढच्या काही दिवसांत घुटमळत राहील. उत्तर लवकरच मिळणार निवडणूकीची अनिश्‍चितता इतिहास जमा झाल्यावर आता बाजार अर्थसंकल्पातून नवे संकेत शोधेल. नव्या सरकराच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था वाढीच्या दृष्टीने धोरणे राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात तेजीचा वरचष्मा कायम राहणार आहे. अनेकवेळा भविष्याकडे आश्‍वासक नजरेतून बघण्याचा समर्पक विचार वाटेमधल्या अडथळ्यांवर मात करायला उपयोगी पडतो. सध्याच्या जागतिक मंदीतून बाहेर येण्यासाठी त्याचा उपयोग होणार का? पुढच्या काही दिवसांत त्याचे उत्तर मिळणार आहे. एकूणच चित्र प्रत्येक वेळी भाव पडल्यावर नव्या खरेदीच्या संधी शोधण्याचा आहे. बाजाराला वास्तवाची जाणीव होण्याअगोदर कमाई करण्याची वेळ शोधून फायदा कसा वाढवता येईल हीच या परिस्थितीत गुंतवणूक नीती उपयोग पडणार आहे. चहा शेअरवर लक्ष द्या चहाचे भाव बाजारात वाढताहेत. त्याचा फायदा चहा उद्योगातल्या शेअरचे भाव चढे राहण्यात होईल. मॅकलऑड रसल (९०.०५) आणि टाटा टीमध्ये (६८२.६०) खालच्या भावात खरेदी केल्यावर चांगला फायदा थोड्या दिवसांत मिळू शकतो. महिन्याभरात शाळा सुरू होतील. शालेपयोगी वस्तूंची मागणी जूनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. नवनीत पब्लिकेश (५४.४५) आणि कॅमलिन (१८.८२) त्यामुळे वाढायला हवेत. पुढच्या चार महिन्यांत विधासभा निडणूक आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठीही राज्य सरकारच्या मदतीचा हात पुढे येऊ शकतो. शुक्रवारी बॉम्बे डाइंगने आघाडी घेण्यामागे ते महत्त्वाचे कारण होते. एचडीआयएलचे मुंबईतले बस्तान बघता येत्या काळात त्या शेअरकडून अपेक्षा बाळगण्यासारख्या आहेत. साखर शेअर महत्त्वाचे? मायावतींना उत्तर प्रदेशात बसलेला झटका साखर उद्योगासाठी आनंदाची बातमी ठरावी. बजाज हिंदुस्तान आणि बलरामपूर चिनी परत वरती उसळी मारण्याची चिन्हे दिसतात/ गेल्या आठवड्यात मंदीच्या चक्रातही बजाज हिंदुस्तान शंभरच्या खाली तुटत नव्हता, बलरामपूर चिनीने ७५ पकडून ठेवला हे लक्षात घेण्यासारखे आहे. बॅंकिंग शेअरने गेल्या आठवड्यात घेतलेली झेप आणि एकूण परिस्थिती बघता येत्या आठवड्यात मंदीच्या सट्टेबाजांची गळचेपी करून बॅंकिंग शेअर विशेषकरून सट्ट्याचे मोठे सौदे होणाऱ्या खासगी क्षेत्रातले बॅंकिंग शेअर जोरदार मुसंडी मारण्याची शक्‍यता जाणवते. बाजार वास्तवाकडे पाठ फिरवून स्वतःच्या चालीने चालतो, तेव्हा फार पुढचा विचार करून हातल्या संधी गमाविणारे यशस्वी गुंतवणूकदाराचे लक्षण नाही. भविष्याची जाणीव बाजाराला होती तेव्हा बघता येईल. तोपर्यंत सुगिचा हंगाम आहे. त्याचा फायदा घेऊन कमाई वाढवत नेणे हेच यशस्वी गुंतवणूक तंत्र. फायदा हाच बाजाराचा आत्मा. त्याच्याशी नाते जुळवता आपलाही नफा आहे.

साभार-विलास महाजन /सकाळ/१६.०५.२००९

पुढे वाचा >>>
सोमवारी शेअर बाजार उसळणार!SocialTwist Tell-a-Friend

Thursday, May 14, 2009

गुंतवणूक करताना सावधानता आवश्‍यक

निवडक शेअरमध्येच खरेदी इष्ट! - डॉ. वसंत पटवर्धन (सा.सकाळ १३मे२००९)

गुंतवणूक करताना सावधानता आवश्‍यक-
निर्देशांक आता कित्येक दिवस 11000 वर राहिला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापेक्षा तो 38 टक्‍क्‍यांनी वर आहे; पण काही शेअर या कालावधीत 40 ते 60 टक्के वाढले आहेत. लार्सन टुब्रोत 56 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 58, रिलायन्स पेट्रो 48 तर स्टेट बॅंकेच्या शेअरमध्ये 45 टक्के वाढ दिसली. शिववाणी ऑईल थ्री आय इंफो, टाटा स्टील, ऑर्बिट कॉर्पोरेशन, युनिटेक, एचडीआयएल या शेअरमध्ये ज्यांनी अल्पमुदतीत विक्री केली असेल त्यांना निदान 35 टक्के फायदा झाला असेल. अनेक विश्‍लेषक जरी याला बेअरमार्केट रॅली म्हणत असले तरी अंदाज चुकल्यामुळे त्यावर पांघरूण घालण्यासाठीचे हे शब्द आहेत.

ज्या कंपन्यांचे मूलभूत स्थैर्य चांगले आहे, त्यांचे भाव आता सतत वर जात राहतील. कारण इथे ठराविक क्षेत्रात भरपूर ऑर्डर आहेत. मागणी नसल्याने मंदी निर्माण व्हायचे इथे अनेक वर्षे कारण असणार नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर लार्सन टुब्रोला गेल्या दोन-अडीच महिन्यात मिळालेल्या कामांची यादी अशी आहे ः 1245 कोटी रुपयांचे काम भूतान हायड्रो पॉवर प्रोजेक्‍टसाठी, 1344 कोटी रुपयांचे काम मंगलोर रिफायनरीकडून, 1436 कोटी रुपयांचे काम आखाती देशातून, 1143 कोटी रुपयांचे काम टाटा स्टीलतर्फे, 1100 कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्‍ट्रिकल कन्स्ट्रक्‍शन विभागातून, 345 कोटी रुपयांचे काम अणुऊर्जा प्रकल्पांच्या क्रिटिकल इक्विपमेंटसाठी, 162 कोटी रुपयांचे काम निवासिका व कारखाने उभारण्यासाठी, 605 कोटी रुपयांचे कंत्राट जल व पोलाद क्षेत्रांतून, अशी एकूण 52000 कोटी रुपयांची कामे लार्सन टुब्रोकडे आहेत. लॅंको इन्फ्रा, इरा इन्फ्रा, युनिटी इन्फ्रा, रिलायन्स इन्फ्रा, जीएमआर इन्फ्रा या कंपन्यांनाही लहान-मोठी कामे मिळतच आहेत.

सॉफ्टवेअर क्षेत्रातही इन्फोसिसने संकेत दिले आहेत तितकी मंदी नाही. थ्री आय इंफोने आपले मार्च 09 वर्षाचे संगठित आकडे प्रसिद्ध केले आहेत, ते चांगले आहेत. पूर्ण वर्षाची विक्री 2285.64 कोटी रुपये झाली व त्यावरील करोत्तर नफा 292.38 कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन 19.02 रुपये होते. सप्टेंबर 08 नंतर मंदी आली, असे म्हटले तरी डिसेंबर 08 व मार्च तिमाहीची विक्री व नफा कमी झालेला नाही. मार्च 09 तिमाहीची विक्री 606 कोटी रुपये होती व नफा 90 कोटी रुपये होता. अन्य सहयोगी कंपन्यांचा 30 कोटी रुपयांचा नफा वजा करूनही नफा 60 कोटी रुपये होता व तिमाही शेअरगणिक उपार्जन 4.80 रुपये होते.

थ्री आय इंफोचा भाव मध्ये 28 रुपयांवरून 48 रुपयांवर गेला होता; पण नंतर तो 42 रुपयांपर्यंत खाली आला होता. याही भावाला किं/ उ. गुणोत्तर फक्त 2.22 पट इतके कमी आहे. शेअरमध्ये जसजशी तेजी वाढेल तसतसे गुणोत्तर वाढत राहील. त्यामुळे वर्षभरात या शेअरमध्ये चांगला नफा मिळावा. पूर्वी या शेअरमध्ये फार व्यवहार दिसायचे नाहीत; पण आता अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष तिकडे गेले असल्याने व्यवहार वाढत आहेत व भाव पूर्वीचा 160 रुपये, अशा कमाल भावाइतका होणे शक्‍य नसले तरी तो 80 रुपयांपर्यंत सहज जावा, असे वाटते. थ्री आय इंफो हा डेरिव्हेटिव्ह व्यवहारांच्या यादीतून सेबीने जूनपासून कमी केला आहे. त्यामुळे त्यात आता सट्टेबाजी न होता, खरे निवेशन होईल.

अजून 50 शेअर डेरिव्हेटिव्ह व्यवहारासाठी जूनपासून कमी केले आहेत. त्यात ऍमटेक ऑटो, बाटा इंडस्ट्रीज, बॉम्बे डाईंग, बिर्ला कॉर्पोरेशन, सेंट्रल बॅंक, डीसीबी, गीतांजली, एस्कॉर्टस, हॅवेल्स, एचसीएल इंफो, गुजरात नर्मदा फर्टिलायझर्स, गेटवे डिस्ट्रिपार्कस, हिंदुस्थान ऑईल एक्‍स्प्लोरेशन, केएसके एनर्जी, लक्ष्मी मशिन वर्क्‍स, कर्नाटक बॅंक, महिंद्र लाइफ स्पेस डेव्हलपर्स, नवभारत व्हेंचर्स, मोनेट इस्पात, एनडीटीव्ही, एनआयआयटी, पेनिन्शुला लॅंड, राजेश एक्‍स्पोर्टस, रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फ्रा, थर्मेक्‍स, स्टाईल अर्कोलॅब, एसआरएफ, युटीव्ही, वॉकहार्ड फार्मा, टॉरेंट पॉवर यांचा समावेश आहे.
शेअर पंधरा ते पंचवीस टक्के भाव खाली-वर नेऊन, सामान्य निवेशकांना झुलवायचा खेळ खेळला. तो आता कमी होईल व कंपन्यांच्या मूलभूत शक्तीवरच आता त्यांचे मूल्यमापन होईल. या यादीतील शेअरचे मार्चचे आकडे बघितल्यानंतर त्यातील काही कंपन्यांचा गुंतवणुकीसाठी विचार करता येईल.
पुढील दोन आठवड्यांनंतर निवडणुकांचे निकाल येतील तेव्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार आहे. नवीन मंत्रिमंडळ कसे असेल, अर्थमंत्री कोण होईल, नवीन अर्थसंकल्प विकासाभिमुख असेल का, त्याची दिशा कशी असेल, हे बघण्यावर बाजाराचा कल बदलत राहील.

सर्व बॅंकांचे नफ्याचे आकडे वाढते आहेत व ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स त्याला अपवाद नाही. मार्च 09 तिमाहीसाठी तिचा नक्त नफा 195.92 कोटी रुपये आहे. मार्च 08 तिमाहीमध्ये तिला 99 कोटी रुपयांचा तोटा होता. सध्या शेअरचा भाव 317 रुपयांच्या आसपास आहे आणि या तिमाहीचा नफा व उपार्जन वार्षिकीकृत केले तर किं/उ. गुणोत्तर 4.1 पट पडते. पूर्ण वर्षाचा मार्च 09 साठी 905 कोटी रुपये आहे. सध्या भाव 136 रु. आहे. बॅंकेचे भाग भांडवल 250.54 कोटी रुपये आहे. तिची नक्त अनार्जित कर्जे फक्त 0.65 टक्का एवढी कमी आहेत. या वर्षी 73 टक्के लाभांश (शेअरवर 7.30 रुपये) जाहीर झाला आहे. केंद्र शासनाचे या बॅंकेत 51.09 टक्के भांडवल आहे.

बॅंक ऑफ बडोदाला यंदा 2227 कोटी रुपये नक्त नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या 1775 कोटी रुपयांपेक्षा तो 55 टक्के जास्त आहे. तिची अनार्जित नक्त कर्जे 1.27 टक्के आहेत. बॅंकेचे भागभांडवल 367 कोटी रुपये आहे. सध्याचा भाव 317 रुपये आहे व पूर्ण वर्षाचे शेअरगणिक उपार्जन 60 रुपये पडते. त्यामुळे किं/उ. गुणोत्तर 5.3 पट पडते. फक्त काही महिन्यांपूर्वीच शेअरचा भाव 181 रुपये होता. त्यामुळे सध्या या शेअरची खरेदी न करता, पुन्हा जेव्हा भाव सुमारे 225 रुपयांपर्यंत येईल, तेव्हा निवेशनाचा विचार करावा. सध्या सर्वच शेअरचे भाव वाढल्याने निवेशन थांबवणे इष्ट!

पुढे वाचा >>>
गुंतवणूक करताना सावधानता आवश्‍यकSocialTwist Tell-a-Friend