स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.
Showing posts with label व्यक्तिपरिचय. Show all posts
Showing posts with label व्यक्तिपरिचय. Show all posts

Sunday, November 22, 2009

यशवंतराव पंतप्रधान का होवू शकले नाहीत?

साभार- लोकप्रभा/२७ नोव्हेंबर २००९ / इतिहास/ प्रा. मो. नि. ठोके

येत्या २५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून गौरविला जाणारा हा द्रष्टा नेता पंतप्रधानपदाची खुर्ची भूषवण्यासाठी योग्य मानला जात होता. पंतप्रधानपदाने त्यांना नेमकी कशी हुलकावणी दिली त्याचा एक ऐतिहासिक धांडोळा.
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे महान नेते होऊन गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय अशीच झाली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल यांच्या हयातीतच पं. नेहरूंनंतर कोण? राजकारणातील या नाजूक प्रश्नाची चर्चा होऊ लागली, तेव्हा त्यावेळी संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत असलेले यशवंतराव चव्हाण यांच्याच नावाची चर्चा होती.

‘आफ्टर नेहरू व्हू?’ या ग्रंथाचे लेखक वेल्स हेंगेन यानी नेहरू यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे योग्य असल्याचे म्हटले होते. तसेच अनेक राजनीतिज्ञ, विचारवंत, संपादक यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले होते. सन १९६७ च्या सुमारास जयप्रकाश नारायण यांनीही यशवंतराव चव्हाण यांची पंतप्रधान म्हणून निवड व्हावी; ते या पदास योग्य नेते आहेत असे मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले होते. फ्रँक मोराईस, एन. जे. नानपोरिया या संपादकांनी नेहरू यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे पंतप्रधान होण्यास लायक आहेत आणि ते चव्हाण यांना शक्यही होईल असे म्हटले होते.मात्र पं. नेहरू यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान झाले आणि लालबहादूर शास्त्री यांच्या दीड वर्षांच्या अल्प कारकीर्दीनंतर श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यानी आपल्या अमर्याद धाडसी वृत्तीने आणि काहीशा सूड वृत्तीने तत्कालीन काँग्रेसमधील बडय़ा नेत्यांना नेस्तनाबूत केले. यशवंतराव चव्हाणही त्यांच्या राजनीतीसमोर निष्प्रभ झाले आणि ते पंतप्रधान कधीच झाले नाहीत. उलट त्यांचा राजकीय शेवट शोकांत झाला. क्लेशदायक झाला!

यशवंतराव चव्हाण यांचे नाव पं. नेहरूंच्या हयातीतच पंतप्रधान म्हणून तत्कालीन मोरारजीभाई देसाई, स. का. पाटील, निजलिंगप्पा, के. कामराज, जगजीवन राम, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी या सर्व काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीवर होते. असे असताना ते पंतप्रधान का होऊ शकले नाहीत, हे पाहणे गरजेचे वाटते.




यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत नेतृत्वासंबंधी अत्यंत आदर बाळगूनही असे म्हणावेसे वाटते की, त्यांचे प्रथमपासूनचे राजकारण तडजोडवादी, हिशेबी दिसते. राजकारणात झोकून देणे, धोका पत्करणे असा त्यांचा पिंड दिसत नाही.

सन १९४६ साली मुंबई राज्य विधानसभेची निवडणूक झाली. काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कृपेने बाळासाहेब खेर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. दे. भ. केशवराव जेधे हे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते. तरीही मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी मंत्रिमंडळ बनविताना त्यांना विश्वासात घेतले नाही आणि बहुजन समाजातील निवडून आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. प्रत्यक्ष राज्यकारभार सुरू झाल्यानंतर शेतकरी-कामगार यांच्या हिताच्या विरोधी धोरणे राबविण्यात येऊ लागली. भांडवलदारांना अनुकूल धोरणे राबविण्यात येऊ लागली. त्यामुळे दे. भ. केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत, तुळसीदास जाधव, काकासाहेब वाघ, पी. के. सावंत, शंकरराव मोरे इ. बहुजन समाजाचे नेते नाराज झाले. या नाराज नेत्यांनी ११ सप्टेंबर १९४६ रोजी पुणे येथे बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसअंतर्गत शेतकरी कामगार संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या बैठकीला यशवंतराव चव्हाण हजर होते. एकूण ४० आमदार हजर होते. ११ जानेवारी १९४७ रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या मुंबई येथील घरी बैठक झाली. या आमदारांच्या बैठकीला यशवंतराव चव्हाण यांनी हजर राहून शेतकरी-कामगार संघ स्थापन करण्याची जरुरी नाही अशी भूमिका मांडली आणि त्यांनी काढता पाय घेतला.

यशवंतराव चव्हाण यावेळी बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात मोरारजीभाई देसाई यांचे पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. त्यांना मंत्रीपद पाहिजे होते, मात्र त्यांना ते न मिळाल्याने ते नाराज झाले होते. तरीही त्यांनी काँग्रेस पक्षात राहणे पसंत केले. कारण शे.का. पक्षात तुळसीदास जाधव, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब राऊत, क्रांतिसिंह नाना पाटील, पी. के. सावंत, रा. ना. शिंदे, व्यंकटराव पवार, के. डी. पाटील, रामभाऊ नलावडे हे बहुजन समाजातील मातब्बर नेते गेले होते. या पाश्र्वभूमीवर आपण बहुजन समाजातील नेते म्हणून आपणास काँग्रेस पक्षात महत्त्व प्राप्त होईल, असा हिशेब करून यशवंतराव काँग्रेस पक्षातच राहिले. यशवंतरावांचा हा मुत्सद्दीपणा होता की चाणाक्षपणा होता की दूरदृष्टीचा विचार होता हे सांगणे अवघड वाटते. शे. का. पक्ष हा शेतकरी आणि कामगार यांचे हित जपण्यासाठी स्थापन झाला होता. आणि स्वत: यशवंतराव हे एका गरीब शेतकरी कुटुंबातील होते. पुढे सन १९५२ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांत शे. का. पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकीत मोरारजीभाई देसाई यांचा पराभव होऊनही ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. यामागे भाऊसाहेब हिरे यांची पुण्याई होती. भाऊसाहेब हिरे हे महसूल व शेती या खात्याचे मंत्री होते. मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई आणि भाऊसाहेब हिरे यांच्यात पहिल्याच अंदाजपत्रकातील महसुलातील उपकर व विक्रीकर वाढविण्यावरून मतभेद झाले. मोरारजीभाईंना हे कर वाढवायचे होते आणि हिरे यांचा कर वाढविण्याला विरोध होता. यामुळे या दोघांत बेबनाव निर्माण झाला. भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्षही होते. मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. या संघर्षांत यशवंतराव यांनी ठाम अशी भूमिका घेतली नाही.


या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू होती. मुंबईसह सारा महाराष्ट्र या चळवळीने ढवळून निघत होता. अशांत होता! धुमसत होता! २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात अनेक माणसं ठार झाली होती. मोरारजींच्या काळात १०५ माणसं ठार झाली होती. संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता यानी हौतात्म्य पत्करले होते. २३ जानेवारी १९५६ रोजी भाऊसाहेब हिरे यानी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोरारजी देसाई यांच्याशी झालेल्या संघर्षांची ही परिणती होती. १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्वैभाषिक राज्याची स्थापना झाली. मोरारजी देसाई अमानुष गोळीबारामुळे आणि हेकेखोर स्वभावामुळे बदनाम झाले होते. ते द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होणे अशक्य होते. हिरे-देसाई वादात यशवंतराव, मोरारजीभाई यांच्याजवळ गेले होते. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी मुख्यमंत्रीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत मोरारजी देसाई यांनी आपले वजन यशवंतरावांच्या पारडय़ात टाकले आणि भाऊसाहेब हिरे यांचा पराभव करून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. पुढे पाच-सहा महिन्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांत महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. संपूर्ण विशाल द्वैभाषिक मुंबई राज्यात काँग्रेसला कसेतरी बहुमत मिळाले आणि यशवंतराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड बसविली. त्यांनी अभ्यासपूर्ण आणि कार्यक्षमतेने कारभार सुरू केला. पुरोगामी धोरणाची खंबीरपणे अंमलबजावणी केली. कृषी-औद्योगिक, समाजरचना हे धोरण अंमलात आणले. सहकार, शिक्षण, साहित्य वाङ्मय, कला, क्रीडा आदी सर्व क्षेत्रात आधुनिक-लोकोपयोगी धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी जनतेचे स्वप्न साकार झाले. बेरजेचे राजकारण करून तुळसीदास जाधव, शंकरराव मोरे, यशवंतराव मोहिते, आनंदराव जाधव, शिवाजीराव पाटील यांना यशवंतरावांनी काँग्रेस पक्षात आणले आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष अगदी मजबुतीने उभा केला. सन १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. यशवंतरावांची आणि काँग्रेसची प्रतिमा/ लौकिक उजळला.

चीनने ऑक्टोबर १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले. भारताची लष्करी तयारी पुरेशी नव्हती. संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि भ्रष्टाचारामुळे भारताचा पराभव झाला. पंतप्रधान पं. नेहरू हादरून गेले. कृष्णमेनन यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. नेहरूंनी नाईलाजाने कृष्णमेनन यांचा राजीनामा घेतला आणि यशवंतराव चव्हाण यांची संरक्षणमंत्री म्हणून नेहरूंनी नियुक्ती केली. यशवंतरावांचा दिमाख्याने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. आपल्या चिकाटीने आणि अभ्यासपूर्ण कामगिरीने त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. लष्करात ते लोकप्रिय झाले! देशात त्यांचा लौकिक वाढू लागला. पं. नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री करण्याचे ठरविले, त्या वेळी मोरारजी देसाई, टी. टी. कृष्णम्माचारी यांनी विरोध केला होता. संरक्षणमंत्री या नात्याने यशवंतरावांची कामगिरी देशपातळीवर लक्षवेधक ठरली. त्यांच्यासंबंधी देशात अपेक्षा वाढल्या. मात्र देशपातळीवरील काँग्रेसमधील नेते मोरारजी देसाई, स. का. पाटील, विजू पटनाईक, डी. पी. मिश्रा यशवंतरावांच्या विरोधी बोलू लागले. यशवंतराव हे प्रांतीय नेते आहेत. बेभरवशाचे आहेत. तडजोडवादी आहेत. तात्त्विक राजकारणावर ठाम भूमिका घेत नाहीत. ते तत्त्वशून्य आहेत. अशी टीका यशवंतरावांवर होऊ लागली. संयमी यशवंतरावांनी या टीकेकडे दुर्लक्ष केले.

सिंडिकेट-इंडिकेटसंबंधी यशवंतरावांची भूमिका नडली :

३ मे १९६९ रोजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे अचानक निधन झाले आणि नवीन राष्ट्रपती कोण असावा यावरून काँग्रेसमध्ये सत्तास्पर्धेचे जोरदार राजकारण सुरू झाले. मोरारजी देसाई, स. का. पाटील, निजलिंगप्पा, के. कामराज, अत्युल्य घोष या उजव्या विचारांच्या नेत्यांचा सिंडिकेट गट आणि श्रीमती इंदिरा गांधी, फक्रुद्दिन अली अहमद, जगजीवन राम, दिनेशसिंग या डाव्या विचाराच्या नेत्यांचा इंडिकेट गट यांच्यात आपल्या विचाराचाच राष्ट्रपती असावा म्हणून डावपेच सुरू झाले. काँग्रेस कार्यकारिणीत सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डींना पाठिंबा दिला. यशवंतरावांनी रेड्डींना आपले मत दिले. रेड्डींना बहुमत मिळाले. यशवंतरावांनी रेड्डींना मत दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांना विचारले तर ते नाईक यांना म्हणाले, ‘‘माझी कमिटमेंट झाली आहे.’’ काय कमिटमेंट झाली आहे हे मात्र चव्हाणांनी नाईक यांना सांगितले नाही. सिंडिकेटने यशवंतरावांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. म्हणूनच यशवंतरावांनी सिंडिकेटला पाठिंबा दिला. यशवंतरावांची हीच भूमिका वादळी ठरली आणि पंतप्रधानपद त्यांच्यापासून दूर गेले.

जुलै १९६९ मध्ये बंगलोर येथे काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यात येणार होता. बंगलोर येथे श्रीमती इंदिरा गांधी, फक्रुद्दिन अली अहमद, जगजीवन राम आणि यशवंतराव चव्हाण यांच्या झालेल्या बैठकीत महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षांत जगजीवन राम यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी फक्रुद्दिन अहमद यांनी पुढे आणावयाचे आणि त्याला यशवंतरावांनी पाठिंबा द्यावयाचा असे चर्चेत बोलले गेले. तेव्हा यशवंतराव म्हणाले की, माझी कमिटमेंट झाली आहे. त्यावर श्रीमती इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘पॉलिटिक्समें बहुतसी कमिटमेंट होती हैं।’’ यावर यशवंतराव हसले. गांधींना वाटले चव्हाणांनी आपल्याला पाठिंबा दिला. कमिटमेंटसंबंधी प्रत्यक्ष चर्चा झाली नाही. यानंतर झालेल्या काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत यशवंतरावांनी जगजीवन राम यांना पाठिंबा दिला नाही. एकमताने निर्णय होत नाही हे पाहून काँग्रेस अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी मतदान घेतले. रेड्डींना पाच मते आणि जगजीवन राम यांना चार मते पडली. या वेळेपासून यशवंतराव हे इंदिरा गांधींच्या मनातून साफ उतरले. दोघा नेत्यांत बेबनाव निर्माण झाला. तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींना श्रीमती इंदिरा गांधींनी रेड्डींच्या विरोधात उभे करून आपली सर्व प्रकारची राजकीय ताकद वापरून राष्ट्रपती म्हणून निवडून आणले. (ऑगस्ट १९६९) राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल लागला. सिंडिकेटचा दारुण पराभव झाला. १७ ऑगस्ट १९६९ रोजी के. कामराज यशवंतरावांना भेटले आणि आपला पाठिंबा आम्हास कायम ठेवा. आम्ही आपणास दिलेला शब्द पाळू असे सांगितले. मात्र यशवंतराव राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सिंडिकेटचा पराभव झाल्यानंतर इंडिकेट गटात सामील झाले. येथेही पुन्हा धरसोड वृत्ती चव्हाणांनी अवलंबिली. मोरारजी देसाई आणि यशवंतराव यांच्यात गुप्त समझोता झाला होता. सन १९६९ पासून १९७२ पर्यंत मोरारजींनी पंतप्रधान राहावयाचे आणि १९७२ नंतर यशवंतरावांनी पंतप्रधान व्हावयाचे. हा गुप्त समझोता इंदिरा गांधींना समजला होता. काँग्रेस फुटली होती. त्यामुळे लोकसभेत काँग्रेसला फक्त २१ चे बहुमत राहिले होते. महाराष्ट्रात यशवंतरावांना मानणारे काँग्रेसचे ४५ खासदार होते. या ४५ खासदारांचा पाठिंबा इंदिरा गांधींना लोकसभेत अत्यंत गरजेचा होता. म्हणून इंदिरा गांधींनी यशवंतरावांना १९७२ नंतर पंतप्रधानपदाचे आश्वासन दिले. गांधींनी राष्ट्रपती निवडणुकीत विजय हस्तगत केला होता. त्यांचे पारडे जड झाले होते. म्हणूनच यशवंतरावांनी गट बदलला. सिंडिकेटमधून इंडिकेटमध्ये गेले.

यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेसंदर्भात ‘चव्हाण अॅण्ड द ट्रबल्ड टू डिकेड’ या पुस्तकात म्हटले आहे की, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या यशवंतराव चव्हाण यांनी रेड्डींना पाठिंबा दिल्यामुळे अत्यंत रागावल्या होत्या. त्या यशवंतरावांना मंत्रिमंडळातूनच काढणार होत्या. मात्र यशवंतरावांकडे महाराष्ट्रातील ४५ खासदार असल्याने त्यांची भूमिका लोकसभेत निर्णायक ठरणार होती. द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी इंदिरा गांधींना सांगितले की, यशवंतरावांना आपल्या बाजूला घेतले की आपला लोकसभेत विजय होईल. त्या बदल्यात त्यांना मंत्रिमंडळातून काढू नये. हा विचार इंदिरा गांधींना पटला आणि त्यांनी यशवंतरावांना मंत्रिमंडळातून काढण्याचा विचार सोडून दिला.

सन १९७०-७१ साली बांगलादेशची निर्मिती पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या अतुलनीय धाडसामुळे- मुत्सद्देगिरीमुळे झाली. पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. त्यामुळे देशात आणि परदेशात श्रीमती गांधींचा मोठा दबदबा निर्माण झाला. त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. या पाश्र्वभूमीवर धूर्त श्रीमती इंदिरा गांधींनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका १९७१ मध्ये घेतल्या. ‘गरिबी हटाओ’चा नारा त्यांनी दिला आणि या निवडणुकीत त्यांना प्रचंड यश मिळाले. त्यांना यशवंतरावांची गरज उरली नाही. त्यामुळे यशवंतरावांना पंतप्रधानपद देण्याचा प्रश्न राहिला नाही. पात्रता-योग्यता, लोकशाही मूल्यावर अविचल निष्ठा असूनही यशवंतराव पंतप्रधान झाले नाहीत, याचेच खूप वाईट वाटते. ठाम-खंबीर भूमिकेच्या अभावामुळे चव्हाणसाहेब पंतप्रधान झाले नाहीत. धरसोड वृत्ती नडली आणि महाराष्ट्र एका सोनेरी इतिहासाला मुकला. चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, अभ्यासू, कार्यक्षम अशा यशवंतराव चव्हाण यांची २५ नोव्हेंबर २००९ रोजी २५ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांच्या पुण्य स्मृतींना नम्र अभिवादन!

lokprabha@expressindia.com


पुढे वाचा >>>
यशवंतराव पंतप्रधान का होवू शकले नाहीत?SocialTwist Tell-a-Friend

Wednesday, July 8, 2009

सेवाग्राम ते शोधग्राम - डॉ. अभय बंग



साभार- ईअनुभव/दीपा देशमुख शब्दांकन - दीपा देशमुख


'महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे' असं गांधीजी म्हणत असत. गेल्या काही वर्षांत मात्र सामाजिक कार्यकर्त्यांची ही परंपरा उतरणीला लागली आहे. त्यावर उपाय म्हणून "सर्च' आणि "एमकेसीएल' या दोन संस्थांनी मिळून "निर्माण" या नावाने एक अभिनव प्रकल्प सुरू केला आहे. समाजासाठी काही करू इच्छिणा-या तरुण-तरुणींसमवेत इथे अनेक प्रयोग केले जातात.
"निर्माण" च्या एका शिबिरामध्ये मुलांशी हितगुज करताना डॉ. अभय बंग यांनी आपल्या सामाजिक जीवनाचा पटच त्यांच्यापुढे उलगडला; त्याचं हे शब्दांकन....

"निर्माण-३" मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा... "निर्माण-३" शिबिरासाठीचा प्रवेश अर्ज येथून डाउनलोड करा.

महात्मा गांधींच्या विचारसरणीचा परिणाम माझ्यावर माझ्या जन्माच्या आधीपासूनच झाला, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. माझे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक. नागपूरला गांधींजींनी सुरू केलेल्या राष्ट्रीय कॉलेजात ते अर्थशास्त्र शिकवत. ते गोल्ड मेडलिस्ट होते. १९४६ चे दिवस होते. भारताला स्वातंत्र्य मिळेल, हे जवळजवळ स्पष्ट झालं होतं. वडिलांना अर्थशास्त्रात अजून बरंच काही शिकायचं होतं. त्यांना अमेरिकेची फेलोशिपही मिळाली होती. अमेरिकेत जाण्यापूर्वी एक आठवडा अगोदर वडिल म. गांधींना भेटायला सेवाग्राममध्ये दाखल झाले. भेटीसाठी दोन मिनिटांचा अवधी मिळाला होता. वडिलांनी आपण अर्थशास्त्र शिकायला अमेरिकेत जातो आहोत असं सांगितलं, तेव्हा बापू म्हणाले, "अर्थशास्त्र शिकायचं असेल तर अमेरिकेत कशाला, ते भारतातल्या कुठल्याही खेड्यात जाऊन शिकता येईल." वडील आश्रमाच्या बाहेर आले आणि त्यांनी आपलं तिकीट तिथंच शांतपणे फाडून टाकलं.
या सेवाग्राममध्ये माझं लहानपण गेलं. त्या वेळी सेवाग्राममध्ये फार महान माणसं होती. मनोहर दिवाण हा असाच एक ध्येयवेडा तरुण होता. त्या वेळी कुष्ठरोगावर फक्त मिशनरीच काम करत. मात्र, गांधींजींच्या एका वाक्यावर या तरुणानं ६० वर्षं कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं व्रत अंगिकारलं. वर्ध्याजवळच्या दत्तपूरमध्ये कुष्ठरोग्यांसाठी काम करणारा हा पहिला भारतीय हिंदू माणूस! गोपाळ वाळुंजकर हाही असाच गोल्ड मेडलिस्ट. गांधीजींना "मी काय करू' असं विचारायला आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, "जा, मेलेली गुरं फाड आणि चर्मकारांना शिकव कशा चांगल्या चपला बनवायच्या!'' या तरुणानं बापूंचा शब्द प्रमाण मानून आयुष्यभर हेच केलं. चर्मशास्त्र विकसित केलं. त्याचप्रमाणं आप्पासाहेब पटवर्धन हाही गोल्ड मेडलिस्ट तरुण, ज्याला पुढं "कोकणचे गांधी' म्हणून ओळखलं गेलं. गांधीजींनी या ब्राह्मण तरुणाला सांगितलं, "सफाईकाम करण्यासाठी आपण जी एक जात निर्माण केलीय, तिला करावं लागणारं काम हे भारतीय समाजावरचं लांछन आहे. जा, तिथं काम कर." आणि या तरुणानं आयुष्यभर हेच काम केलं. जेलमध्ये गेल्यावरसुद्धा या माणसानं, "मला 'क' वर्गाची व्यवस्था द्यावी" अशी विनंती केली. तसंच जेलमध्येसुद्धा जेलच्या सफाईचं काम द्यावं, ही मागणी केली. अशी माणसं आणि अशी त्यांची ध्येयनिष्ठा.

"निर्माण-३" मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा... "निर्माण-३" शिबिरासाठीचा प्रवेश अर्ज येथून डाउनलोड करा.
गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात नेमकी काय जादू होती? त्यांचं आयुष्य एक मिशन मानायला हवं. जो अंतिम माणूस आहे, शेवटचा माणूस, त्याची समस्या घ्यायची, असं विलक्षण आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. राम मनोहर लोहिया फायर ब्रॅंड वक्ते म्हणून त्या वेळी ओळखले जात. मात्र डॉ. लोहिया, नेताजी सुभाषबाबू, पंडित नेहरू असे सारेच नेते गांधीजींना भेटत आणि म्हणत, आम्ही इतक्या तयारीनं बोलतो, पण त्याचा इतका प्रभाव पडत नाही. मात्र तुम्ही काय बोलता हे लोकांना धड कळतही नसावं, तरीही कोट्यवधी माणसं तुमचं ऐकतात, हे कसं? त्या वेळी गांधीजी म्हणत, "मी जे जगलो नाही ते मी लोकांना सांगितलं नाही."
द. आफ्रिकेपासून गांधीजींनी संडास साफ करण्याचं काम स्वत: केलं. चपला बनवायचंही ते शिकले. म्हणूनच गोपाळ वाळुंजकर असो वा अप्पासाहेब पटवर्धन, या माणसांना त्यांनी तेच सांगितलं जे त्यांनी स्वत: केलं होतं. म्हणूनच त्यांच्या "नई तालीम" पद्धतीचं शिक्षण म्हणजे जगण्यातून शिक्षण आहे. उदा. मूल कसं चालतं? प्रेम कसं केलं जातं?
माझ्या आयुष्याचं मिशन हे वयाच्या १३ व्या वर्षीच ठरलं. मी आणि माझा भाऊ अशोक, जो तीन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा, एक दिवस पिंपरी गावी सायकलनं जात होतो. टेकडीच्या पायथ्याशी तो मला म्हणाला, "अभय, आपण आता मोठे झालोत. आपण जीवनात काय करायचं ते ठरवून टाकू." आम्ही पाचच मिनिटांत ठरवलं. प्रश्र्न समोर होतेच. अशोकनं कृषी शिकायचं आणि मी डॉक्टर व्हायचं. शिकून याच देशात राहून काम करायचं. अशोक आजही कोरडवाहू शेतीवर प्रयोग करतोय.
मी नागपूरच्या ë0;ेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झालो. कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी डिसेक्शन हॉलमध्ये माझा टेबल पार्टनर चंद्रपूरचा होता. त्यानं दूरच्या टेबलावरची एक मुलगी दाखवली. तो म्हणाला, ""ती मुलगी नीट बघून ठेव. ती स्कॉलर आहे. तुझी तिच्याशी स्पर्धा आहे. ती कायम पहिली आली आहे.'' ती मुलगी होती राणी! राणी ही एक विलक्षण मुलगी होती. अत्यंत नामांकित श्रीमंत घराण्यातली मुलगी असूनही अतिशय साधेपणाची स्वप्न असलेली ही मुलगी पुढं माझी जोडीदार बनली.
१९७७ चा काळ असेल. आम्ही मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडल्यावर ठरवलं होतं, की वर्धा जिल्ह्यातून आपल्या कामाची सुरुवात करायची. ही व्यवस्था बदलवण्याची स्वप्नं उराशी घेऊन आम्ही निघालो होतो. आपल्यासारखी, आपल्या विचारांची अनेक माणसं भेटतील आणि आपलं स्वप्नही पुरं होईल. आयुष्यभर झोकून देत काम करायचं, आणि या झोकून देण्यात एक विलक्षण आनंद असतो. १९७८ साली वर्धा येथे मी आणि राणीनं कामाला सुरुवात केली. "चेतना विकास" नावाची संस्था होती. वर्ध्याहून जवळच कान्हापूर नावाचं ७०० लोकसंख्या असलेलं गाव आम्ही निवडलं. तिथं आरोग्याचं काम करण्यासाठी क्लिनिक उघडलं. तीन वर्षं हे क्लिनिक चालवलं.
ही आरोग्यसेवा आम्ही अगदी किरकोळ म्हणजे २५ पैसे शुल्क घेऊन दिली. आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यायचं, अन्यथा नाही, हेही आम्ही ठरवलं होतं. मात्र यातून अनेक गमतीजमती घडत होत्या. गावातल्या लोकांचा समज वेगळाच होत होता. इंजेक्शन देत नाही तो डॉक्टर कसला? आम्हाला इंजेक्शन देता येतच नसावं, असंही त्यांना वाटत होतं. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. या गावात अजाबराव ईवनाते नावाचा एक आदिवासी होता. तो शेतमालकाकडे काम करत असे. काम करताना मशिनमध्ये त्याच्या हाताचा चेंदामेंदा झाला. हात कापावा लागला. हा अन्याय स्वीकारायचा? करायचं काय? कदाचित हे चित्र संघर्षात्मक कार्यातून बदलेल असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन गावबैठक बोलावली. अजाबरावला न्याय मिळवून द्यावा, गावक-यांच्या लक्षात परिस्थिती आणून द्यावी आणि शेतमालकानं आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि अजाबरावाला नुकसानभरपाई द्यावी, असा आमचा उद्देश होता. या गावबैठकीला फक्त तीन जण उपस्थित होते. एक अजाबराव स्वत: आणि त्याचे दोन दारूडे मित्र ! गावकरी आले नाहीत, तरीही आम्ही धीर सोडला नाही. त्यांनी त्यांच्या घरातूनच ऐकावं, या तयारीनं आम्ही लाऊडस्पीकरवरनं बोलत राहिलो. यावरचा गावकऱ्यांचì6; प्रतिसाद फारच चमत्कारिक होता. अजाबरावविषयी पोटतिडकीनं बोलत असतानाच आम्ही रुग्णसेवा दिली त्या घराघरांतून आमच्यावर दगडफेक सुरू झाली. आम्ही जीव वाचवून कसेबसे परतलो.
हा अपमान खूप जिव्हारी लागला होता. पुरते १५ दिवस आम्ही गावात गेलोच नाही. गावकऱ्यांनी आम्हाला ही वागणूक का दिली, हा प्रश्र्न मनाला अस्वस्थ करीत होताच. त्यांनी असं का केलं याचं जे उत्तर मिळालं ते सुन्न करणारं होतं. त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही रुग्णसेवा करायला आलात ती करा. पण तुम्ही आम्हाला फसवलंत. तुम्ही खरंतर, नेतागिरी करायला आला होतात! त्याचबरोबर, ज्या शेतक-यानं नुकसानभरपाई द्यावी असं आम्ही म्हणत होतो तो ५०-६० एकर जमिनीचा मालक असूनही त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. ही जमीन संपत्ती नसून एक ओझं होतं. आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय होती. तो स्वत:च्या कुटुंबाचंही पोट भरू शकत नव्हता, गावकऱ्यांची सहानुभूती त्याच्याबद्दल तितकीच होती. आम्हाला या घटनेतून कळलं, की रुग्णसेवा देऊन प्रश्र्न सोडवता येत नाहीत.
"निर्माण-३" मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा... "निर्माण-३" शिबिरासाठीचा प्रवेश अर्ज येथून डाउनलोड करा.
१९७०-८० या दहा वर्षांत आम्ही अनेक सामाजिक संघटनांना भेटलो. आम्ही गरिबांना संघटित करायचं ठरवलं. ४० गावांचं संघटन केलं. रोजगार हमी योजनेसाठी आम्ही सरकारविरुद्ध न्यायासाठी लढायला सज्ज झालो होतो. आम्ही अनेक मोर्चे काढायचो. सातत्यानं कलेक्टरला भेटायचो. पण मजुरांची मजुरी ३ रुपयांवरून ४ रुपये वाढली, इतकाच काय तो फरक पडला. आम्हाला लक्षात आलं, की हेही काही खरं नाही.
या सगळ्याचं उत्तर शोधताना एकदा वि. स. पागे आमच्या घरी आले. मी क्रांतीच्या धुंदीत होतो. प्रत्येक माणसाला किती कॅलरीजची आवश्यकता असते इथपासून अनेक पैलूंवर मी अभ्यास करत होतो. पागे समितीनं केलेल्या अहवालाची मूळ प्रत मिळवली. त्यांनी ही मजुरी ठरवताना कशा प्रकारे गणितं केलीत, हेही अभ्यासलं. किमान १२ रुपये मजुरी असायला हवी जिथं ती ४ रुपये मिळत होती. एक छोटासा निबंध काही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाला. या सगळ्या प्रयत्नांचं फलित म्हणजे महाराष्ट्रातल्या ६० लक्ष मजुरांची मजुरी ४ रुपयांवरून १२ रुपये झाली. हा वेगळाच अनुभव होता. संघटना, मोर्चे काढून जे झालं नाही ते एका तीन महिन्यांच्या संशोधनाने साध्य झालं. आमच्या हेही लक्षात आलं, की निव्वळ सेवेनं समाज बदलत नाही, तर त्यामागं बौद्धिक कुवत, ज्ञानाची जोड देण्याचीही गरज असते.
हे सर्व चालू असताना एक गोष्ट आमच्या 54;क्षात आली, की रोगाचं मूळ आपल्या देशात, मात्र संशोधनं होतात बाहेरील देशात. उदा. क्षयावरील संशोधन केलं जर्मनीच्या रॉबर्ट कॉकने. माझ्या देशात जो रोग पसरतो त्या वेळी माझे डॉक्टर्स काय करतात, हा प्रश्र्न मला भेडसावू लागला. माझ्या देशातील आयुर्वेदाची पद्धती प्राचीन, मात्र तिच्यातही कोणी पुढं संशोधन केलं नाही. दु:खद वास्तव असं, की इथले डॉक्टर्स जे संशोधन करत होते ते अमेरिकेत होणा-या रोगांवर. राणीनं आणि मी ठरवलं, आपण आता संशोधनाची पद्धत शिकायची. त्यासाठी अमेरिकेला जाणं आवश्यक होतं. आम्ही अमेरिकेत एक वर्षासाठी (१९८४ साली) गेलो. आमचे गुरू होते कार्ल टेलर. परत येताना आम्ही पुस्तकं, स्लाइड प्रोजेक्टर घेऊन परतलो. भारतात आल्यावर कुठं काम करायचं, हा प्रश्र्न होता. संशोधन करायला खूप सुविधांची गरज असते. या सुविधांची पूर्तता शहरात होऊ शकते. शहरात जावं की जाऊ नये, या द्विधा अवस्थेत असताना म. गांधींचं वाक्य आठवलं, "भारत के देहातोंमें जाओ।"
आमचा मुलगा आनंद चार वर्षांचा होता. त्याला गोष्ट सांगताना आम्हालाही आमच्या प्रश्र्नाचं उत्तर मिळालं. अकबर-बिरबलाची प्रसिद्ध गोष्ट होती ती. अकबराच्या आदेशानुसार बिरबलाला दहा मूर्खांचा शोध घ्यायचा होता. अंगठी जंगलात नदीच्या पलीकडे हरवलेली असताना एक मूर्ख ती जिथं दिव्याचा उजेड आहे तिथं शोधत होता. बिरबलाला दहावा मूर्ख शिरोमणी सापडला आणि आम्हाला आमच्या प्रश्र्नाचं उत्तर! आमचे प्रश्र्न खेड्यात होते आणि आम्ही उत्तर शहरात शोधायच्या विचारात होतो. १९८५ साली आम्ही गडचिरोली बघायला गेलो आणि १९८६ साली तयारीनिशी गडचिरोलीत पोहोचलो. सेवाग्रामपासून सुरू झालेली ही कथा शोधग्रामच्या टप्प्यावर येऊन पोहोचत होती.
मध्यपूर्वेला छत्तीसगड, दक्षिण तेलंगणा (आदिवासींचा मागासलेला भाग), आंध्र प्रदेशाची सीमा, ६०% जमीन जवळजवळ जंगलानं व्यापलेली, मोठमोठे तलाव. डोंगराच्या माथ्यावर टिप्पा नावाचा तलाव. गडचिरोली जिल्ह्याची ४०% लोकसंख्या माडिया गोंड होती. बस्तर-गडचिरोलीत देवीच्या मूर्ती गावाबाहेर होत्या. गावात आरोग्यसेवा नसल्यामुळे त्यांनी बहुधा या देवी निर्माण केल्या असाव्यात. या लोकांची उपजीविका जंगलातून मोहाची फुलं गोळा करणं, वाळवणं, खाणं आणि दारू बनवून पिणं यावर होत होती. मुख्य पीक धानाचं होतं. ६०% लोक जे गैरआदिवासी होते ते शेती करत होते. मोळ्या करून शहरात विकणं, असं काहीबाही करायचे. काही तर गवताच्या बियांवर जगणारी कुटुंबं होती. रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट. कठाणी नदीचा २०-२५ वर्षांपासून खचलेला पूल... पूर आला की अनेक 27;ावांशी संपर्क तुटलाच म्हणून समजा. १९८६ साली असाच प्रचंड पूर आला. ७ दिवस पाण्यात अडकलो...
"निर्माण-३" मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा... "निर्माण-३" शिबिरासाठीचा प्रवेश अर्ज येथून डाउनलोड करा.
अशा या गडचिरोलीत एका गोडाऊनच्या जागेत "सर्च'ची स्थापना झाली. सर्चचा लोगो म्हणजे एका अंधारलेल्या जंगलातली पाऊलवाट- एक शोध. गडचिरोलीत काम करतानाच महाराष्ट्राचे आरोग्य सचिव आम्हाला भेटले आणि म्हणाले, "तुम्ही इतके बाहेर देशात जाऊन शिकून आलात. तुम्ही जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी स्वीकारावी,'' असं आम्हाला वाटतं, दोन मंत्री आणि सचिव यांच्यासोबत चर्चा झाल्यावर त्यांनी जीआर काढला. त्यानुसार सर्चला शासकीय यंत्रणा सुधारण्याचे अधिकार मिळाले. आरोग्यसेवेसाठी रुग्णांची संख्या वाढू लागली. राणीच्या जबाबदारीखाली जिल्ह्यातलं पहिलं सिझरिन सेंटर सुरू झालं. ही वाट देखील तितकीशी सहज नव्हतीच. हळूहळू शासकीय व्यवस्थेचे काटे बोचायला लागले.
गडचिरोलीत माणसं मलेरिया आणि न्यूमोनियानं मरत होती आणि शासन मात्र कुटुंब नियोजनाच्या मागं होतं. जिथं विकास तिथं कुटुंब नियोजन, हे एक वेळ ठीक होतं. मात्र इथं परिस्थिती वेगळी होती. इथल्या लोकांच्या गरजा वेगळ्या होत्या, शासनाच्या योजना मात्र वेगळ्याच होत्या. दुसरी अडचण म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेला भ्रष्टाचार. मलेरियाचे अनेक रुग्ण रोज दाखल होत. एका रुग्णाला क्लोरोफिन गोळ्या हॉस्पिटलमधून देण्यात याव्यात, असं सांगितलेलं असतानाही त्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गोळ्या आणण्यासाठी त्या रुग्णाला आपला पाणी पिण्याचा तांब्या विकावा लागला. या घटनेची चौकशी केली असता लक्षात आलं, की महाराष्ट्र शासनाकडून क्लोरोफिन या गोळ्या आल्याच नव्हत्या. औषधाचं जे बजेट होतं त्यात आवश्यकता नसतानाही इरिथ्रोमायसिनचा साठा विकत घेण्यात आला होता. जवळपास ३० वर्षं पुरेल इतका साठा गडचिरोलीच्या माथी मारण्यात आला होता. तो परत पाठवून मी रोषास कारणीभूत ठरलो.
जिल्हा रुग्णालयातील अशा एकेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. एका सुताराकडून ५० रुपये लाच घेताना सिव्हिल सर्जनला पकडलं गेलं. कामं करायला सगळी खालची यंत्रणा असे. त्यांच्या बैठका घेतल्यावर अनेक गोष्टी नजरेत आल्या. पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारानं पोखरलेली होती. हे सगळं बघताना आमची स्वप्नं डळमळीत होऊ लागली. आम्ही व्यवस्था बदलवू शकत नव्हतो. त्यातच काही घटना अशा घडल्या, ज्यात सिव्हिल सर्जनच्या बेधुंद कारभारामुळे काही रुग्णांना डोळ्यांचा त्रास झाला. दोषी असणाऱ्या व्यक्तींऐवजी आम्हालाच दोषी ठरवण्यात आलं. वर्तमानपत्रांनीही 61;ेडलाइन्स छापल्या. विधानसभेत प्रश्र्न चर्चिला गेला. विधानसभेने चौकशी समिती नेमली. आम्हाला तुरुंगात टाकावं, अशीही मागणी झाली. अनेक मनस्तापांना तोंड द्यावं लागलं. मात्र अखेर आम्ही या सर्व आरोपांतून सहीसलामत सुटलो. वर्तमानपत्रांनीही माफी मागितली. आणि आमच्या लक्षात आलं, आपण यंत्रणा बदलायला गेलो तर बाकी सगळ्या यंत्रणा आपल्या विरोधात जातात. अखेर १९८७ साली आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या जबाबदारीचा राजीनामा दिला. १९७७ ते १९८७ हा दहा वर्षांचा कालावधी असा अपयश, विश्वासार्हता गमावणं अशा नाही नाही त्या गोष्टी सहन करण्यात गेला. एडिसनच्या उदाहरणाप्रमाणं या अपयशातून एवढंच कळालं, की १२ हजार पद्धतींनी दिवा चालत नाही. आम्ही हेही शिकलो आणि पुढच्या पावलांसाठी तयार झालो.
शोधग्रामची पाऊलवाट चालायला सुरुवात केली. गडचिरोलीतल्या अनुभवांनी आम्हाला बरंच काही शिकवलं. गडचिरोलीत एक कावीळ झालेली मुलगी रुग्ण म्हणून आली. तिचं रक्त तपासलं तर वेगळ्या आकारांच्या रक्तपेशी आढळल्या. (ज्यांना सिकल सेल म्हणतात) म्हणून गडचिरोलीत सिकल सेलसंदर्भात सर्व्हे केला. सर्वेक्षणात जे दिसलं ते आम्ही पालकमंत्र्यांशी बोलून जाहीर केलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी आदिवासी आरोग्य रिसर्च सेंटर सुरू करू असं सांगितलं, जे पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजला त्यांनी सुरूही केलं. आम्ही आदिवासींकडे गेलो. त्यांना या रोगाबद्दल कल्पना दिली. मात्र आदिवासी नेते म्हणाले, या रोगाचा आमचा काय संबंध? तुम्ही एक थेंब रक्त मागितलं, आम्ही दिलं. रोग तुमच्या डोक्यात आहे.
आपल्या डोक्याला बौद्धिक खाज असते म्हणून संशोधन करायचं नसतं. त्याचा उपयोग होत नाही. लोकांना वगळून तर नाहीच नाही, हे आम्हाला समजलं. आम्ही लोकांकडे जाऊन बसायला लागलो. आम्ही आदिवासींसाठी शिबिरं घेतली. त्यांच्याशी आरोग्याबाबत बोलत राहिलो. तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला तुमच्या दवाखान्याची भीती वाटते, कारण तिथं देव नसतो. देव असेल तिथं आम्हाला आमच्या घरासारखं वाटतं. दवाखान्यातल्या नर्सच्या पांढ-या कपड्यांचीही त्यांना भीती वाटे. नातेवाईकांपासून तोडणारा दवाखाना जवळ करण्यापेक्षा आपल्या माणसांजवळ मरण आलेलं चांगलं, अशी त्यांची भावना होती. या आदिवासींना विश्वासात घेतलं तेव्हा त्यांच्या मनातल्या एकेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि शोधग्रामचा दवाखाना आकार घेऊ लागला. आता या दवाखान्याला नाव काय द्यायचं, हा प्रश्र्न समोर येताच त्यांच्याकडे उत्तरही तयारच होतं- 'मॉं दंतेश्वरी दवाखाना' जरा वेगळं नाव बघू या का, असं सुचवताच त्यांच्याकडून ठाम नकार आला आणि उत्तर मिळालं, "आता हा आमचा दवाखाना आहे, तुमचा नाही''. झोपडीस42;ृश्य दवाखाना करताना उदयगावच्या लेखागोडी गावच्या लोकांनी तर उत्साहानं येऊन झोपडीही बांधून टाकली. आणि बघता बघता झोपड्यांचं रुग्णालय उभं राहिलं. दंतेश्वरी!
एखादी गोष्ट आमची आहे, असं लोक म्हणतील अशाच गोष्टीच्या शोधात आम्ही होतो. ४० लोकांच्या सहभागानं हे उभं राहिलं. इथं वर्षातून एकदा जत्रा भरते. देवीची पूजा केली जाते. नृत्य, गाणी सादर होतात. आरोग्य संसदही भरते. लोकांसोबत काम करायचं असेल, तर कोणताही प्रश्र्न सोडवण्याची सुरुवात त्यांच्यापासूनच करावी, हा धडा आम्ही शिकलो.
राणीला लोकांच्या मनात शिरून सगळं काढून घेण्याची कला अवगत आहे. इथं बायका सारख्या कानाफुसी करतात, हे तिच्या लक्षात आलं होतं. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं, की त्यांना पदर जाणं, ही फार मोठ्या प्रमाणात घडणारी गोष्ट आहे. पदर जाणं म्हणजे पांढरं पाणी अंगावरून जाणं. बायका काय म्हणतात, त्यांच्या लैंगिक कल्पना काय आहेत, याविषयी राणीनं "कानोसा' या पुस्तकात लिहिलं आहे. या पुस्तकाद्वारे बायांचं दडलेलं विश्व छापील स्वरूपात बाहेर आलं.
आम्ही दोन गावांत छोटासा अभ्यास केला. दोन गावांतल्या बायांना तपासलं. वसा आणि अमिरसा ही ती दोन गावं. गावानं अविश्वास वाटावा इतकं सहकार्य केलं. सहा महिने रोज १० ते १५ केसेस मतदानाच्या केंद्राप्रमाणे तपासू लागलो. गावात जेवढ्या म्हणून बायका होत्या, त्यातील ९२% बायांना स्त्रीरोग झाल्याचं आम्हाला आढळलं. वर्षानुवर्षं हा रोग पाळला जात होता. आम्ही यावरील पेपर अमेरिकेत पाठवला. १९८९ मध्ये तो प्रकाशित झाला आणि अविकसित देशातल्या स्त्रियांमधल्या रोगांविषयीचा हा जगातला पहिला अभ्यास ठरला. आमच्या असं लक्षात आलं की, ८५% लोकांनी कधीच उपचारही घेतला नव्हता, ५५% मुलींचे लग्नाआधीच लैंगिक संबंध सुरू असलेले आढळले. जागतिक तज्ज्ञांनी हा पेपर म्हणजे महत्त्वाचं अध्ययन मानलं. रिप्रॉडक्टिव्ह हेल्थची स्त्रियांना गरज आहे, स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका या अभ्यासानं जागतिक स्तरावर अभ्यासली गेली. लोक, सेवा आणि अध्ययन इथं एकत्र आलं आणि यातून या संशोधनाचं फलित साध्य झालं.
काम दुप्पट वेगानं सुरू झालं. गावोगावी जाऊन बायांना सांगण्यात आलं. सुईणींना प्रशिक्षित करण्यात आलं. नाच, गाणी, खेळ याद्वारे जागृती करण्यात आली. या प्रशिक्षित सुईणींचा दीक्षांत समारंभ थाटात करण्यात आला. डोक्यात ज्ञान, हृदयात प्रेम घेऊन या सुईणी बाहेर पडल्या. भारताच्या नॅशनल पॉलिसीतही बदल करण्यात आले.
<b>२ ऑक्टोबरचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी घराबाहेर बाजूलाच मोकळ्या मैदानात भटक्या लोकांचा पडाव होता. त्यांचा कलकलाट चालू होता. काय झालंय बघितलं असता त्यांच्यातला एक तंबू जळून खाक झाला होता. रात्री केव्हा तरी नवऱ्याने दारूच्या नशेत तंबूला आग लावून भांडण करून तो निघून गेला होता. तंबूसहित संसाराचं सगळं जळून खाक झालं होतं. आपल्या १३ मुलांना घेऊन एक बाई एकटी उभी होती. त्या बाईला आम्ही थोडीफार मदत केली; पण प्रश्र्न मिटलेला नव्हता. रात्री झोप येईना. खरं तर हा काही वैद्यकीय विषय नव्हता; पण मन अस्वस्थ झालं. गावातल्या बायांसोबत बोलू लागलो आणि एकेक करीत बाया सांगू लागल्या. खरा छळणारा रोग होता दारू! प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला दारूचा जणू शाप लागला होता. वैधव्याची आकांक्षा निर्माण करणारा असा हा रोग होता. एका सुईणीचा नवरा मेला. तिचं सांत्वन कसं करावं, या विचारात राणी असता ती सुईण मात्र आनंदानं म्हणाली, ""बरं झालं बाई तो मेला!'' प्रत्येक घरात याहून वेगळी स्थिती नव्हती.
मग आम्ही या संदर्भात शोध सुरू केला. ७०० लोकसंख्या असलेलं बोधले गाव. १९८८ साली इथं एक लक्ष रुपयांची दारू विकली जात होती. आम्ही एकूण १०४ गावांचा अभ्यास केला. शासकीय आकडेवारीही मिळवली. गडचिरोलीत २० कोटी रुपयांची दारू खपली जात होती. या जिल्ह्याचं विकासाचं बजेट होतं १४ कोटी रुपये! गडचिरोलीतील या आकडेवारीनं आम्हाला त्यांच्या गरिबीचं कारण कळालं. काहीतरी करायला हवं होतं. खरं तर केंद्र सरकारचे आदेश होते, की आदिवासी भागात दारूविक्रीचं लायसन्स द्यायचं नाही. पण केंद्र सरकारच्या नीतीविरुद्ध राज्य सरकार हे काम करीत होतं.
जिल्ह्यात सेल्फ मल्टिप्लाइंग प्रोसेस सुरू झाली. आम्ही परिषद घ्यायचं ठरवलं. परिषदेला फार तर १०० लोक येतील असंही वाटलं. आम्ही आमदार, कलेक्टर, एसपी, साऱ्यांना बोलावलं. कधी तोंड न उघडणा-या बाया बोलू लागल्या होत्या. हिरामण वरखेडेजींच्या नेतृत्वाखाली लोकांनी वर्गणी गोळा केली. सर्वपक्षीय दारूबंदी संघटना स्थापन झाली. आंदोलन झालं. लोकांनी आपआपल्या गावांत दारूबंदी केली. दारू पिणा-या पुरुषांसाठी १५० गावांत कोंडवाडा तयार केला. ३३० स्वयंसेवी संघटनांनीही आवाज उठवला आणि मागणी केली- दारू बंदी करा! दारूवर उत्पन्न मिळवून देणारा हा जिल्हा आपल्या हातातून जातो की काय, अशी भीती सरकारला वाटू लागली. सरकारनंही धास्ती घेतली. लोकांनी तर दिसेल ते दारूचं दुकान फोडायला सुरुवात केली. ê0;्यामुळे हजारभर किलोमीटर दूर असलेल्या मुंबईला ऐकावं लागलं. पूर्ण जिल्ह्यातील २२०० वैयक्तिक दारूचे परवाने रद्द करण्यात आले. ६० दारूची दुकानं बंद झाली आणि १९९३ साली गडचिरोलीत दारूबंदी लागू झाली. शासनानं कायदा केला- ज्या गावातील ५१% बायका दारूबंदीची मागणी करतील, तिथं दारू बंद होईल. वर्ध्यात गांधी आणि विनोबा होते. गडचिरोलीत ना कोणी गांधी, ना कोणी विनोबा होते. पण त्यांच्या विचारांतून ६००० खेड्यांतले ६ लाख लोक एकत्र झाले आणि त्यांनी हा पराक्रम करून दाखवला. ज्ञान, संघटन, आंदोलन, परिवर्तन हे आपोआप घडत नसतं. लोक आले, शोधग्राम अस्तित्त्वात आलं. मोजमापाचं शास्त्र आलं, संघटन आलं, आंदोलन आलं. शोधग्राममध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालं.
आपण सगळे मातीच्या पायांचे आहोत. एखादी समस्या हृदयाला भिडते आणि मनाचं द्वंद्व सुरू होतं- माझं घर सांभाळू की त्याचं घर उभं करू? गांधीजी म्हणत, लोकांशी नातं जुळवलं पाहिजे. ही फार मोठी ताकद आहे. आपली जीवनमूल्यं सार्वकालिक आहेत. ती आपल्याला ताकदच देतात. दक्षिण आफ्रिकेत २०-२२ वर्षांचे गांधीजी पोट भरण्यासाठी गेले होते. कोणतंही उदात्त ध्येय घेऊन ते गेले नव्हते. मात्र त्यांनी तिथं जाऊन काय इतिहास घडवला हे आपण जाणतोच.
विचार करून पहा. प्रत्येकामध्ये एक छोटासा गांधी दडलेला असतो. प्रत्येक जण कामाला लागला तर खूप काही घडू शकतं.


--डाँ.अभय बंग (Dr. Abhay Bang)
सर्च, पो.ऑ.शोधग्राम,
जिल्हा गडचिरोली, पिन कोड - ४४२६०५.
फोन : ०७१३८ - २५५४०६/२५५४०७


शब्दांकन- दीपा देशमुख
adipaa@gmail.com

"निर्माण-३" मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा... "निर्माण-३" शिबिरासाठीचा प्रवेश अर्ज येथून डाउनलोड करा.




नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....



जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, ê0;्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा




पुढे वाचा >>>
सेवाग्राम ते शोधग्राम - डॉ. अभय बंगSocialTwist Tell-a-Friend

Friday, July 3, 2009

धर्मवीर संभाजीराजे !

साभार- श्री मिलिंद एकबोटे/दै.सनातन/विशेषांक


महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते, ही बाब श्री. वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या विद्वान इतिहास संशोधकांनी समाजासमोर मांडली आणि एका महान सत्याला उजाळा मिळाला. संभाजीराजांची खरी ओळख करून देणारा हा लेख त्यांच्या अलौकिक कृत्यांची माहिती देतो.

औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे...

संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.

संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती...

संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्‍तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.

हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !

शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुद्धिकरण्यासाठी' आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्‍न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !

संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.

धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे...


शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.

संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली...

संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.

शेर शिवा का छावा था ।

देश धरम पर मिटनेवाला
शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परमप्रतापी,
एक ही शंभू राजा था ।।

तेज:पुंज तेजस्वी आँखे,
निकल गयी पर झुका नही ।
दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का,
दिव्य स्वप्न तो मिटा नही ।।

दोनो पैर कटे शंभूके,
ध्येयमार्ग से हटा नही ।
हाथ कटे तो क्या हुआ,
सत्कर्म कभी भी छुटा नही ।।

जिव्हा काटी खून बहाया,
धरम का सौदा किया नही ।
शिवाजी का ही बेटा था वह,
गलत राह पर चला नही ।।

रामकृष्ण, शालिवाहन के,
पथसे विचलित हुआ नही ।।
गर्व से हिंदू कहने मे,
कभी किसी से डरा नही ।।

वर्ष तीन सौ बीत गये अब,
शंभू के बलिदान को ।
कौन जिता कौन हारा,
पूछ लो संसार को ।।

मातृभूमी के चरण कमल पर,
जीवन पुष्प चढाया था ।
है दूजा दुनिया में कोई,
जैसा शंभूराजा राजा था ।।


शंभूतीर्थ साकार व्हावे, ही श्रींची इच्छा !

श्रीक्षेत्र वढू, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे यांची समाधी आहे. या ठिकाणी राजांच्या जीवनचरित्राला शोभणारे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य आता वेगात सुरू आहे. भुईकोट किल्ल्याच्या स्वरूपातील या स्मारकामध्ये शंभूछत्रपतीच्या तेजस्वी जीवन चरित्रावरील शिल्पप्रदर्शनी, ऐतिहासिक वस्तूंचे व ग्रंथांचे संग्रहालय इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर या वीरभूमीवर मराठी युवकांसाठी लष्करी विद्येचे शिक्षण केंद्र (कमांडो ट्रेनिंग) सुरू करण्याचा धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचा संकल्प आहे.
हे सर्व काम केवळ लोकवर्गणीतून चालू असून साधू-संतांचे आशीर्वाद आणि इतिहासकारांचे मार्गदर्शन या कार्याला लाभले आहे. त्यामुळे हे कार्य पूर्णपणे यशस्वी होणारच याची खात्री आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगडानंतर श्रीक्षेत्र वढूचे महात्म्य मानले जाते. श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे. हा प्रेरणादायी इतिहास साकार होणार आहे `शंभूतीर्थ' या शंभूछत्रपतींच्या स्मारकाच्या रूपाने !

शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।
जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।


संभाजीराजांचे प्रत्येक हिंदु बांधवावर उपकार आहेत.त्यांनीच संपूर्ण भारतवर्षातील हिंदु धर्माचे रक्षण आपल्या कारकीर्दीत तसेच आपल्या मृत्यूनंतरसुद्धा केले, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच श्री गगनगिरी महाराज म्हणतात,
"श्रीक्षेत्र वढू (संभाजीराजांचे समाधीस्थान) जगातील सर्व हिंदु धर्मियांची पुण्यभूमी आहे !''


लेखक-श्री. मिलिंद रमाकांत एकबोटे, कार्याध्यक्ष, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, महाराष्ट्र.




नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....


जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा




पुढे वाचा >>>
धर्मवीर संभाजीराजे !SocialTwist Tell-a-Friend

Saturday, May 23, 2009

श्री अरविंद गुप्ता

श्री अरविंद गुप्ता हे गेल्या २५ वर्षापासून कृतीशील विज्ञान शिक्षणाचे प्रचारक म्हणून कार्यरत आहेत.त्याचबरोतर जागतिक दर्जाचे साहित्य हिंदीमध्ये भाषांतर करून मुलांपर्यंत पोचविण्याचे काम देखिल ते करताहेत.सध्या ते चिल्ड्रेन्स सायन्य सेंटर, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स, पुणे येथे कार्यरत आहेत. एक अभियंता, शिक्षक, पुस्तकपेमी, भाषांतरकार अशी त्यांची कितीतरी रुपे आपल्याला पहायला मिळतात.
"मलां मुलांमध्ये खेळणीवाला म्हणून ओळखणे खूप आवडेल" ते स्वत:बददल बोलताना म्हणतात. IIT खरगपूर येथून अभियंता म्हणून बाहेर पडल्यावर त्यांनी TELCO मध्ये काम केले, आणि आज आपलं जीवन मुलांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून वैज्ञानिक तथ्ये सोपी करुन सांगण्यासाठी वाहून घेतले आहे. आपल्या कामाबदल बोलताना ते म्हणतात." २५ वर्षापूर्वी मला असं जाणवलं की वैज्ञानिक तथ्ये मुलांना जर खेळण्यांच्या साहयाने शिकविता आली तर ती त्यांच्या चांगली लक्षात राहतात." याच तत्वावर ते काम करतात. व मुलांचे शिक्षण आनंददायी करतात.आणखी एक गोष्ट ही खेळणी ते तयार करुन आयती मुलांच्या हाती देत नाहीत तर ती तयार कशी करायची याचे मार्गदर्शन करतात. मुलांना यातून सर्जनशीलतेचा आनंद मिळतो.त्यांनी खूप विषयांवर खेळणी बनविली आहेत. एखादया जादूगाराने आपल्या पोतडीतून आश्चर्यकारक वस्तू बाहेर काढाव्या तसे ते वैज्ञानिक खेळणी काढतात.उदाहरणादाखल सांगायचे झाले तर काडेपेटीच्या काडयांपासून तयार केलेला मेकॅनो,चुंबक व बॅटरीपासेन तयार केलेली मोटार,फिल्म रोल आणि सायकलच्या टयूबपासून बनविलेला फुगे फुगविण्याचा पंप,,वर्तमानपत्रापासून बनविलेला गोटया खाणारा उंदीर, काडयापेटीचे विविध खेळ,असे खूप काही सांगता येईल. यात मुलेआणखी खूष होतात जेव्हा ते ही सर्व खेळणी स्वत: बनवू शकतात.

साधी सोपी आणि कुणीही बनवू शकेल अशी ही खेळणी सहसा घरातल्या साहित्यातून बनविता येतात. निरुपयोगी पुठठे, सायकलचे टयूब, रिकामी टूथपेस्टची टयूब, कागद, बॅटरी , पेनची रीफील, रिकामे खोके, बाटल्या, खेळणी बनविण्यासाठी खतील काहीही त्यांना चालते. त्यासाठी दुकानातून महागडे साहित्य काहीही आणावे लागत नाही; आणि अशा कच-यातून ते विज्ञान शिकविणारी सुंदर खेळणी तयार करतात. ते सांगतात "हे साहीत्य गोळा करण्यातच खरी मजा आहे. आणि मला नाही वाटत या साहित्याचा कधी तुटवडा पडेल. आपल्याला यातून मुलांना सवय लावायची आहे की या कच-यात दडलेली अनेक खेळणी त्यांनी स्वत: शोधावीत व स्वत: तयार करावीत."

ही टाकावू वस्तूंपासून खेळणी तयार करण्याची सवय त्यांनी लहानपणापासून जपली आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या श्री गुप्ता यांना खेळण्यांचा खर्च परवडण्यासारखा नव्हता म्हणून त्यांनी त्यावर हा मार्ग काढला. त्यांना त्यांच्याजवळ असलेली तुटकी पेटी आजही आठवते ,ज्यात अनेक निरुपयोगी वस्तूंचा भरणा होता आणि जे त्यांच्या प्रयोगासाठी साहित्य ठरले.,जरी साहित्य अपुरे असले तरी त्यातून निर्माण होणारी खेळणी मात्र अमर्याद होती. "माझे आईवडील शाळा शिकलेले नव्हते पण मुलांसाठी मात्र त्यांनी अत्यंत चांगले शिक्षण दिले.माझ्या आईने आम्हा भावंडांना आत्मविश्वास दिला. माझ्या खेळण्यांबददल तिने कधीही विरोध केला नाही, तर मला नेहमी उत्तेजनच दिले. " ते पुढे सांगतांना म्हणतात.त्यांच्या मनावर लहानपणापासून एक तत्व बिंबले होते " जर तुम्हाला देवाला आवडायचे असेल, तर गरीबांची सेवा करा."एका ननचे हे शब्द अजूनही त्यांना ऐकू येतात.,आणि हेच त्यांच्या कार्यातूनही प्रतिबिंबीत होते आहे.

घरची परीस्थिती हलाखीची असूनही श्री. गुप्ता यांनी IIT त प्रवेश मिळविला तो आपल्या प्रखर बुदधीमत्तेच्या जोरावर. पुढील पाच वर्षे शिकण्यात , ज्ञान मिळविण्यात गेली, "मला माझ्या अभ्यासक्रमापेक्षाही जास्त माझ्या सहकार्यांकडून शिकायला मिळाले.," ते चटकन बोलुन जातात. ब-याचदा वर्ग बुडवून मित्रांसोबत विविध प्रकारचे मॉडेल त्यांनी तयार केले.

आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नोकरीसाठी TELCO मध्ये रुजू झाले. तेथेसुदधा कामगारांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. त्यानी कामगारांचे लॉगबुक मराठीमध्ये केले ज्याचा कामगारांना फायदा झाला . कामगारांना त्यांनी अभियांत्रिकीचे सोपे सोपे कंसेप्ट शिकवायला सुरुवात केली.उदा. सर्किट डायग्राम इ.

पण त्यांना तिथे चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. त्यानी एक वर्षाची अध्ययन रजा घेतली व होशंगाबाद सायंस टीचिंग प्रोग्राम (HSTP) येथे प्रवेश घेतला.या प्रशिक्षणाची प्रेरणा होती,मुलांना विज्ञान कृतियुक्त आणि प्रयोगशीलतेने शिकविणे. सहा महिने त्यांनी तिथे काम केले. या ठिकाणी त्यांना टाकावू वस्तूंपासून खेळणी तयार करण्याची प्रेरणा मिळाली व येथेच त्यांनी त्यांचे पहिले खेळणे बनविले मॅकॅनो, काडेपेटीच्या काडया व सायकलच्या वॉलच्या रबरापासून त्यांनी हा मॅकॅनो बनविला होता.

तेव्हापासून त्यांना मागे वळून कधी असे पाहिलेच नाही.त्यांनी जवळपास २५० खेळणी व शैक्षणिक साधने टाकावू वस्तूंपासून बनवली आहेत. ही सर्व खेळणी त्यांनी शब्दरूप करून त्याची पुस्तकेही काढली आहेत.जी अनेक भाषांमध्ये अत्यंत माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. Little Toys, Ten Little Fingers, String Games, Matchstick Models and Other Science Experiments , Pumps from the Dump, and The Toy Bag ही काही नावे सांगता येतील. गुप्ता यांनी कंट्रीवाईड क्लासरुम साठी जवळपास ७० हून अधिक फिल्मस बनविलया आहेत.,त्याचबरोबर तरंग ही दूरदर्शनवरील मालिका सुदधा त्यांचीच निर्मिती आहे.याचबरोबर देशभरातील जवळपास १३०० शाळांमध्ये त्यांनी खच विषयावर कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांच्या या कार्याबददल त्यांना पहिला विज्ञान प्रसारक पुरस्कार आणि UGC चा हरी ओम श्री पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या खडतर प्रवासात त्यांना अनंत अडचणी आल्या पण ते आपल्या मार्गावर ठाम राहिले व आजही मुलांचे विज्ञान शिक्षण नुसते शिक्षण न रहावे तर त्यात मुलांना गंमत वाटावी मजा वाटावी , ही प्रक्रिया आनंददायी व्हावी म्हणून ते प्रयत्नशील आहेत.त्यांचा हा प्रयत्नही असतो की त्यांची ही खेळणी गरीब मुलांपर्यंत पोहचावी त्यामागचे विज्ञान त्याला समजावे. शिक्षणात त्याला गरीबीची अडचण येवू नये. "आपली सरासरी एक धारणा असते की , विज्ञानाचे प्रयोग हे फक्त प्रयोगशाळेत आणि परीक्षानळया व काचेच्या चित्रविचित्र पात्रांमधूनच करता येतात.पण सूत्रांच्या जंजाळात अडखळल्यापेक्षा सोप्या पदधतीने देखिल विज्ञान शिकता शिकता येतात." श्री गुप्ता सांगतात.. "मुलांसाठी तर सर्व विश्व म्हणजे प्रयोगशाळा आहे. आम्ही मुलांना निसर्गाच्या जवळ जायला शिकवायचे विसरलो आहोत. आपण जर त्यांना दाखवून दिले की गतीचे नियम, भूमितीचे नियम त्यांच्या आजूबाजूलाच असतात तर विज्ञान शिकताना त्यांना काहीच अडचण येणार नाही."

मुले आणि विज्ञान यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी श्री अरविंद गुप्ता यांना असे वाटते की यासाठी देशपातळीवर प्रयत्न व्हायला हवे आहेत.विज्ञानविषयक नियतकालिके तसेच वेबसाईट नसल्याबददल ते खंत व्यक्त करतात. खबाबतीत त्यांना आयुका कडून अपेक्षा आहेत.
या विज्ञानप्रसाराबरोबरच श्री गुप्ता हे भाषांतराच्या कामातही भरीव योगदान देत आहेत. त्यांना १०० च्या वर पुस्तके भारतिय भाषांमध्ये भाषांतरीत केली आहेत.मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांचे हे प्रयत्न आहेत.,गेल्या १५ वर्षांपासून ते National Book Trust शी संबंधित आहेत. त्यांचे ब्रीदवाक्यच आहे "A million books for a billion people."

येथे त्यांना भेटता येईल.





आमचे येथे सर्व प्रकारच्या मोबाईल्सची अत्यल्प दरांत काँम्पुटराईज्ड रिपेअरींग केली जाते. तसेच सर्व प्रकारची अँसेसरीज, मेमरी कार्ड भरुन(download करुन) मिळतील.
संपर्क- "श्री" कम्युनिकेशन, लोकमान्य शाळेसमोर, मोसम पूल, मालेगांव-४२३२०३
प्रोप्रा. श्री गणेश बापूराव खैरे मो. ९२२६२१६२२६
टिप- १.चाँईसची गाणी मिळणार नाहीत.
        २.५१२ mb व २५६ mb मेमरी कार्ड भरुन मिळणार नाही.


पुढे वाचा >>>
श्री अरविंद गुप्ताSocialTwist Tell-a-Friend

Friday, May 15, 2009

लोकशाही ते दलालशाही....

म.टा/१८.०४.२००९/माणसं


कुमार सप्तर्षी
संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल, महाराष्ट्र.

डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील समाजवादी परिवारातील धडाडीचे आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. सत्तरच्या दशकात स्थापन झालेल्या युवक क्रांती दलाचे ते एक संस्थापक. तेव्हा लोकआंदोलनांनी साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या युक्रांदचे अलीकडेच डॉ. सप्तर्षी यांच्या पुढाकाराने पुनरुज्जीवन झाले आहे. ते पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाचे संपादकही आहेत. 'गांधी स्मारक निधी' या समाजसेवी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
______________________


१९७७ सालची लोकसभा निवडणूक! २६ जानेवारी दिवशी येरवडा तुरुंगामधून सुटलोे. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणुका जाहीर करून आणीबाणीचे निर्बंध थोडे शिथिल केले होते. १९ महिने वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिपचा बडगा उगारलेला होता. त्यामुळे फक्त इंदिरा गांधींचं नाव पेपरांमध्ये प्रसिद्ध व्हायचं. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक झाल्याची, त्यांना कुठल्या तुरुंगात ठेवलंय याबद्दल कसलीच बातमी प्रसिद्ध व्हायची नाही. १९ महिने ज्यांचे नाव कानावर पडले नाही, त्यांना लोक नक्कीच विसरले असतील अशी कल्पना सारे करीत होते. पण 'मिसा' कायद्याखाली कारावासात असलेल्या अगदी सामान्य कार्यर्कत्यालाही पाहण्यासाठी गदीर् जमू लागली. हा अनपेक्षित प्रकार होता. ही निवडणूक काँग्रेसच जिंकणार अशी काँग्रेस व काँग्रेसेतर पक्षांची खात्री होती. स्पर्धा नव्हतीच. एका बैलाला १९ महिने रोज एनिमा दिल्यानंतर व त्याला अहोरात्र गोठ्यात बांधून ठेवल्यानंतर तो मरतुकडा होणार हे स्वाभाविक होतं. त्याला चालणंही जड झालेलं. त्याला अचानक सांगण्यात आलं की, 'तुला आज १९ महिने पेंडीचा खुराक खाल्लेल्या बलवान बैलाबरोबर पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा आहे.' अशा शर्यतीचा निकाल पूर्वनिश्चित असतो. तसाच १९७७ लोकसभा निवडणुकीचा निकालही होता. काँग्रेस बहुमताने जिंकणार आणि इंदिरा गांधी आणीबाणीच्या निर्णयावर मतदारांकडून शिक्कामोर्तब करून घेणार, हे उघड दिसत होतं.

निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि अचानक आक्रित घडू लागलं. तुरुंगातून सुटलेल्या कार्यर्कत्यांना लोक जणू संत वा देवाची माणसं मानू लागले. सजवलेल्या बैलगाडीमधून मिसा स्थानबद्धांच्या गावोगाव मिरवणुका निघू लागल्या. मिसा स्थानबद्ध नाही मिळाला तर त्याच्या लहान मुलाला किंवा एखाद्या नातेवाईकाला गाड्यावर बसवून गावकरी मिरवणुका काढू लागले. विरोेधी पक्षाजवळ पैसा नव्हता, गुन्हेगार नव्हते; पण जनशक्ती होती. राजशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी ठाकली. लोक पेटले होते. जागृत झाले होते. बंधनातून सुटका झाल्यामुळे वृत्तपत्रे सुसाट सुटली होती. आणीबाणीत जे जे गैर घडले, त्याचे चित्र ते जनतेपुढे ठेवत होते. निवडणूक आयोग, आचारसंहिता यांचा धाक राहिला नव्हता. मुद्दा एकच, 'हुकूमशाही हवी की लोकशाही हवी?' जेव्हा भवितव्य ठरविण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो, तेव्हा लोक 'पोलिटिकली करेक्ट' निर्णय घेतात. हिंदी भाषिक राज्यांमधून जनतेने काँगेसची हकालपट्टी केली. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, ओरिसा अशा सहा राज्यांमध्ये जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आले. अपवाद फक्त राजस्थानात एका मतदारसंघाचा. महाभारत घडले. वनवासातले, शक्तिहीन पांडव विजयी झाले. बलाढ्य कौरव पराभूत झाले.

जनता पक्षाच्या व्यासपीठावर न जाता युक्रांदीय 'नागरी स्वातंत्र्य' नावाच्या स्वतंत्र व्यासपीठावरून आणीबाणीच्या विरोधात प्रचार करीत होते. मला वाटत होते की, काँग्रेस निवडणुका जिंकणार आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान होणार. त्या पुन्हा सर्वांना कारावासात पाठविणार, असेही वाटे. पुन्हा तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला तर आपण भूमिगत होऊन काम करायचे, असा मी निश्चय केला. म्हणून नगर जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात मी आणीबाणीच्या विरोधात सभा घेऊ लागलो. या उपक्रमाला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सभेनंतर लोकांना मी वर्गणी मागायचो.

९ ऑगस्ट १९७७ रोजी युक्रांदमधील सिनियर कार्यर्कत्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. पूर्वाश्रमीचा कोणताही पक्ष नसलेली, जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेली तरुणांची पिढी जनता पक्षात मी प्रवेश केल्यानंतर माझ्या पाठीशी उभी राहिली. मी जनता पक्षाचे अध्यक्ष चंदशेखर यांचा नगर जिल्ह्यात दौरा आखून तो यशस्वी पार पाडला. माझा पिंड जनआंदोलनाचा आणि त्यातून संघटन करण्याचा. आंदोलनाइतकी निवडणुकीची गोेडी वाटत नव्हती. त्यामुळे जनता पक्षाच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार करायचा एवढेच ठरविले होते. पण जनता पक्षाने अहमदनगर शहर मतदार संघात मलाच विधानसभेची उमेदवारी दिली.

केंद सरकारमध्ये तेव्हा मंत्री असलेले हेमवतीनंदन बहुगुणा दिल्लीहून निरीक्षक व पक्षश्रेष्ठी म्हणून आले होते. त्यांनी मला मुद्दाम बोलावून घेतले. ते म्हणाले, 'तुला पक्षाने तिकीट का दिले ठाऊक आहे का? तू पुरीच्या शंकराचार्यांबरोबर पुण्यात झालेल्या जाहीर विवादात त्यांची भंबेरी उडवली होतीस. त्या माणसाने उत्तर प्रदेशात गोहत्याबंदी आंदोलन करून खूप हिंसाचार घडवून आणला. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हापासून मी तुला लांबून ओळखतो. चंदशेखरजींनी त्यांचा उमेदवार म्हणून तुझे एकट्याचे नाव सांगितले आहे. एक गोष्ट लक्षात ठेव. तुला यशस्वी व्हावेच लागेल. पक्षात आमची इभ्रत पणाला लागलीय. आंदोलनामधून आलेल्या कार्यर्कत्यांना निवडणुकीतील यशापयशाचे सोयरसुतक वाटत नसते. पण आमच्यासाठी सारे बळ एकवटून लढ.'

बहुगुणा यांच्या बोलण्याने माझ्यात उत्साह संचारला. जॉर्ज फर्नांडिस यांनी एका माणसामार्फत पाच हजार पाठविले. मोहन धारियांनी वीस हजारांचा निधी दिला. माळी समाजाची प्रत्येक निवडणुकीच्या आधी गुप्त बैठक होते. कोणत्याही पक्षातफेर् उभा असो, माळी जातीच्या उमेदवाराला देण्यासाठी ते आथिर्क निधी जमवितात. अकलूज परिसरातील माळी समाज तत्कालीन आमदार शंकरराव मोहित्यांच्या दबावाखाली चूप होता. आतून धुमसत होता. अकलूजला व माळशिरस तालुक्यात शंकरराव मोहित्यांच्या विरोधात सभा घेतल्यामुळे माळी समाज माझ्यावर बेहद्द खूष होता. त्यांनी एक प्रतिनिधी पाठवून मला दहा हजार रूपये दिले. त्यांचा प्रतिनिधी म्हणाला, 'माळी समाजाने तुम्हाला 'ऑनररी माळी' मानले आहे. तुमच्या वाट्याचा हा निधी!'

त्यावेळी नगर शहर छोटे होते. मतदारसंख्या एक लाख होती. बहुतांश लोक एकमेकांना ओळखत. तेव्हा महाविद्यालयाचे तरूण व तरूणी माझ्या बाजूने खूप सक्रिय झाले. पण त्या काळात त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. मी हस्ताक्षरात पत्र तयार केले. त्याचा ब्लॉक करून आंतरदेशीय पत्रांवर तो मजकूर छापला. ती पत्रे मित्रांना पाठविली. त्यात मी लिहिले होते की, 'किमान शंभर रूपये व कमाल पाचशे रूपये या मर्यादेत निवडणुकीसाठी निधी पाठवा. शंभर रूपयापेक्षा कमी रक्कम पाठविणार असाल, तर कृपया तसदी घेऊ नका. कारण तुम्ही अडचणीत असणार हे उघड आहे. पाचशे रूपयांपेक्षा अधिक रक्कम कृपया पाठवू नये. कारण तुम्ही अधिक रक्कम पाठविली तर तुमच्या माझ्याकडून वैयक्तिक अपेक्षा वाढतील. कदाचित त्या मला पूर्ण करता येणार नाहीत.'

माझे प्रतिस्पर्धी उमेदवार नगरचे तेव्हाचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष नवनीत बाशीर्कर होते. ते निवडणुकीच्या डावपेचांमध्ये अतिशय निष्णात. पण त्यांचे सारे डाव निष्प्रभ झाले. याचे एकमेव कारण आहे. मला त्यांचे डावपेच कळतच नव्हते. मी प्रत्येक चौकात दहा मिनिटांच्या सभांचा गदारोळ उठवला. 'प्रामाणिकपणा हाच एकमेव डावपेच' आणि 'जनआंदोलन हेच संघटन' हे सूत्र धरून चाललो. मी अननुभवी, पैसे नसलेला, जात-धर्म न मानणारा म्हणून हमखास पडणार, असे नगरवासियांनी सुरवातीस गृहित धरले. पत्रे पाठविल्यामुळे बावीस हजार रूपये जमा झाले. माझा एकूण खर्च चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत झाला. अनेक मित्रांनी आपापल्या परीने प्रचाराच्या रिक्षा लावल्या. फलक लावले. भिंती रंगविल्या. त्यांची बिले त्यांनी परभारेच भागवली. एकूण नऊ उमेदवार होते. बहुतेकंाकडे कोणत्यातरी जातीचे गठ्ठा मतदान होते. मला प्रत्येक जातीचे आणि धर्माचे थोडे थोडे मतदान लाभले. एकूण बेरीज इतरांपेक्षा अधिक झाली. ब्राह्माण समाजाने कोऱ्या मतपत्रिका टाकल्या. मी स्वजातीचे दोष जाहीर दिंडोरा पिटवून सांगतो हा त्यांचा माझ्यावर आरोप होता. ते म्हणत, 'आपली आई दिसायला कुरूप असेलही, पण ढोल बडवून जगाला तसे सांगायचे नसते. जात म्हणजे आपली आई! कशीही का असेना ती प्रिय असलीच पाहिजे.'

३१ वर्षे लोटल्यानंतर मी आज काय पाहतो? २ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय विधानसभेची आणि किमान १२ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय पक्ष लोकसभेची उमेदवारी देतच नाही. १९८० सालापासून राजकारणाचे गाडे घसरणीला लागले. सर्व पक्षांच्या (अगदी आमच्या जनता पक्षाच्याही) नेत्यांनी राजकारणात एक भाषा सुरू केली. एका विशिष्ट सुरात सारे बोलत. 'लोक फार बिघडले आहेत, पैसा मिळाल्याशिवाय कुणी मतदान करीत नाही.' उमेदवारी देताना 'व्यक्तीचे चारित्र्य, त्याचे विचार, कार्य, पक्षनिष्ठा' या गोष्टी अत्यंत गौण ठरल्या. उमेदवारीचा एकच निकष बनला, 'इलेक्टीव्ह मेरीट!'. काळा पैसा, पाळीव गुंड व जात यांचे गणित राजकारणात महत्त्वाचे असते, हा विचार गेल्या तीस वर्षात पद्धतशीर रुजवण्यात आला. परिणामी राजकीय पक्ष संपले. कार्यर्कत्यांची जागा दलालांनी आणि वैचारिक भूमिकेची जागा तथाकथित 'सोशल इंजिनअरींग' नामक पोकळ तत्त्वज्ञानाने घेतली. नेते लोकप्रिय राहिले नाहीत. ते 'दलालप्रिय' बनले. पक्षांतर्गत लोकशाही संपविण्यात आली. राजकारण म्हणजे दलाली असे समीकरण बनले. 'दलालशाही' नावाची नवी विचारप्रणाली प्रभावी बनू लागली.

या सर्व घटनांचा परिणाम म्हणून पंधराव्या लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये ठळक झाली आहेत. यावेळी एकही राजकीय मुद्दा धसास लागलेला नाही. बालवाडीतील पोरे जशी पोराटकी करतात, एकमेकांच्या खोड्या काढतात, तशी लोकसभेची निवडणूक चालू आहे. नेते म्हणजे जणू बालवाडीतील व्रात्य पोरे! त्यांना जमेल तेव्हा त्याला केव्हाही चिमटे घ्यायची सवय लागली. खोडेल स्वभाव हेच त्यांचे चारित्र्य! नि:संकोचपणे राजकीय पक्ष गुन्हेगारांना तुताऱ्या फुंकून त्यांच्या पक्षात प्रवेश देतात. वर शेखी मिरवितात, 'वाल्या कोळ्याचा वाल्मिकी बनतो हे लोकांनी लक्षात घ्यावेे.' वास्तविक पुढारीच वाल्या कोळी आहेत; तेव्हा ते दुसऱ्या वाल्यांचे वाल्मिकी कसे करणार? निवडणुकीत पैसा, जातीयवाद व गुन्हेगार या गोष्टींवर हमखास मात करता येते, पण त्यासाठी जनआंदोलन, जनसंघटन, पक्षांतर्गत लोकशाही, जनजागृती या गोष्टींवर विश्वास हवा. अजूनही सारे संपलेले नाही. बहुतांश जनतेला सारे काही कळते. परिस्थिती अशीच चालू राहिली तर राजकीय क्षेत्राचे तुकडे तुकडे होतील. त्यामुळे अराजकाचा झंझावात येऊ शकतो. त्यानंतर काय घडेल; याचा अंदाज पाकिस्तानात आज जे चालू आहे, त्यावरून बांधता येतो..........
मी आज काय पाहतो? २ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय विधानसभेची आणि किमान १२ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय पक्ष लोकसभेची उमेदवारी देतच नाही. १९८० सालापासून राजकारणाचे गाडे घसरणीला लागले. सर्व पक्षांच्या नेत्यांनी राजकारणात एक भाषा सुरू केली, 'लोक फार बिघडले आहेत, पैसा मिळाल्याशिवाय कुणी मतदान करीत नाही.' उमेदवारी देताना 'व्यक्तीचे चारित्र्य, त्याचे विचार, कार्य, पक्षनिष्ठा' या गोष्टी अत्यंत गौण ठरल्या. उमेदवारीचा एकच निकष बनला, 'इलेक्टीव्ह मेरीट!'. काळा पैसा, पाळीव गुंड व जात यांचे गणित राजकारणात महत्त्वाचे असते, हा विचार गेल्या तीस वर्षांत पद्धतशीर रुजवण्यात आला. परिणामी राजकीय पक्ष संपले. कार्यर्कत्यांची जागा दलालांनी आणि वैचारिक भूमिकेची जागा तथाकथित 'सोशल इंजिनअरींग' नामक पोकळ तत्त्वज्ञानाने घेतली. नेते लोकप्रिय राहिले नाहीत. ते 'दलालप्रिय' बनले. पक्षांतर्गत लोकशाही संपविण्यात आली. राजकारण म्हणजे दलाली असे समीकरण बनले. 'दलालशाही' नावाची नवी विचारप्रणाली प्रभावी बनू लागली.

 

अल्प परीचय:

संपुर्ण नाव: डॉ. कुमार गणेश सप्तर्षी
जन्म दिनांक: २१ ऑगस्ट १९४१
घरचा पत्ता: प्रबोधन को ऑपरेटिव हौसिंग सोसायटी,
६१-अ ४/९,एरंडवणा, पुणे-४११००४
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२५४३१७२९)
कार्यालयीन पत्ता: ’क्रांतिनिकेतन’ १४६८ सदाशिव पेठ खजिना विहिर चौक,
एस. पी. क़ॉलेजसमोर, पुणे-४११०३०
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४६१४०९)
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४७५८६६)
शिक्षण: बी. एस्सी. (एस. पी. क़ॉलेज)
एम.बी.बी.स. (बी.जे. मेडिकल क़ॉलेज पुणे)
प्रथम वर्ष (एल.एल.बी)
व्यवसाय: पुर्ण वेळ सामाजीक कार्यकर्ता
संघटनात्मक कार्य: (अ) १९६७- जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम ता. नवादा जि. गया येथे दुष्काळग्रस्तांसाठी मदतकेंद्र चालवले.
(आ) कोयना भुकंपग्रस्ताना मदतकार्य.
(इ) नोव्हें.१९६७ मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना.
(ई) १० मे ते १५ मे १९६८ श्री. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात १५०० तरुणांची १५ दिवसांची ‘श्रम संस्कार छावणी’ संघटीत केली.
(उ) आणीबाणी पहिले ३ महिने भुमीगत कार्य, २ ऑक्टोबर १९७५ पासुन २६ जानेवारी १९७७ पर्यंत येरवडा कारागृहात मिसा स्थानबद्ध.
(ऊ) १५ ऑगस्ट २००१ युवक क्रांती दलाची पुन:स्थापना अध्यक्ष म्हणुन कार्यरत

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....



जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६" व "नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा



पुढे वाचा >>>
लोकशाही ते दलालशाही....SocialTwist Tell-a-Friend